रस्त्यातील खड्ड्यांना मातीची मलमपट्टी
By Admin | Published: August 8, 2015 09:51 PM2015-08-08T21:51:20+5:302015-08-08T21:51:20+5:30
डहाणू-बोर्डी सागरी मार्गावर खड््यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर खडी मिश्रणाने ते बुजवण्या पेक्षा मातीची मलमपट्टी करण्यात धन्यता मानली
बोर्डी : दि. ०७ (वार्ताहर) डहाणू-बोर्डी सागरी मार्गावर खड््यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर खडी मिश्रणाने ते बुजवण्या पेक्षा मातीची मलमपट्टी करण्यात धन्यता मानली आहे. पावसाळी वातावरणात त्यातील माती बाहेर निघून रस्ता चिकट झाल्याने, ये- जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना बे्रक न लागल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावरील नरपड मांगेल आळीनजीक रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. चिखले बर्वेवाडी येथील मोरी भगदाड पडण्याच्या स्थितीत आहे. मरबाडा, टोकेबीज या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. घोलवड या राष्ट्रीय दर्जा प्राप्त गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अधिकच दयनीय आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे आदी महत्वाच्या कार्यालयासमोर अर्धाफूट खोलीचे खड्डे पडल्याने संबंधीत कार्यालयात विविध समस्यांचे निराकरणाकरीता येणाऱ्या नागरीकांच्या त्रासात अधिकची भर पडते.
अशा रस्त्यांमुळे महिलांनी गर्भपात व अवेळी प्रसूतीची भीती व्यक्त केली असून, एस.टी, रिक्षा, मालवाहू वाहनांचे चालक, दुचाक ीस्वार, आणि पादचाऱ्यांना अपघाताचे भय सतावते आहे. बोर्डी खुटखाडी पुलाचा संरक्षक कठडा तुटला आहे. तर बोरीगाव घाटातील मार्ग धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात डोंगरउतारावरून पाणी व चिखल रस्त्यावर जमा होतो. त्यात रस्त्यालगत पाणी निचरा करणारी मार्गीका नसल्याने दोन्ही बाजूला पाण्याचे ओहळ असतात.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असून, डहाणू, तलासरी कार्यालयांतर्गत येतो. दरवर्षी प्रमाणे डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना बुजविण्याकरीता मातीचा भराव घालण्यात आला. मात्र पाऊस आणि वाहतुकीची रहदारी यामुळे परिस्थिती जैसे थे झाली आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीच्या भरावाने बुजत असतील तर कोट्यावधींचा खर्च करण्याची गरज काय? अशी टीका होत आहे. (वार्ताहर)