आरपीएफची खंडणीखोरी, प्रवाशांचा घेराव

By admin | Published: July 6, 2016 02:25 AM2016-07-06T02:25:46+5:302016-07-06T02:26:53+5:30

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानका जवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे ११ डबे घसरल्याने बंद पडलेली वाहतूक मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यासाठी एकीकडे रेल्वे काटेकोर

RPF ransom, passage of passengers | आरपीएफची खंडणीखोरी, प्रवाशांचा घेराव

आरपीएफची खंडणीखोरी, प्रवाशांचा घेराव

Next

- हितेन नाईक , पालघर

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानका जवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे ११ डबे घसरल्याने बंद पडलेली वाहतूक मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यासाठी एकीकडे रेल्वे काटेकोर प्रयत्न करीत होती. तर दुसरीकडे लांब पल्ल्याचा गाडयातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आरपीएफ जबरदस्तीने पैसे उकळत असल्याच्या निषेधार्थ प्रवाशांना पहाटे पालघरच्या स्टेशन मास्टरला घेराव घालावा लागला.
काल सोमवारी पहाटे डहाणू आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, रेल्वे रूळ उखडले, व ओव्हरहेड वायर तुटली, सिग्नल तुटले यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व मुंबईहून दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी जणाऱ्या गाडया तब्बल १२ ते १८ तास रखडल्या, रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्ना नंतर मुंबई कडील अप लाईन सुरु करण्यात यश आले असले तरी डाऊन लाईन वरून सोडण्यात येणारी सेवा सुरु करण्यासाठी आज ११ वाजले. मुंबई येथून पहिली दूरांतो निजामुद्दीन एक्सप्रेस गाडी गुजरातच्या दिशेने रवाना झाली.
मुंबईहून डाऊन लाईनवरून सोडण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाडयामधून प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली असतांना त्या प्रवाशांना बेकायदा प्रवासी ठरवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याने आज पहाटे ३.४५ वाजता गुजरात मेल डाऊन गाडीतील प्रवाशानी पालघरच्या स्टेशन मास्टरला घेराव घातला. अखेर असे कोणतेही कृत्य आरपीएफने करू नये, अन्यथा त्याच्या विरोधात कारवाईचा अहवाल पाठविण्यात येईल असे जाहीर केल्या नंतरच प्रवाशांनी आपला घेराव संपुष्टात आणला. डहाणू जवळचा उखडलेला ट्रॅक दुरु स्त करण्याचे काम सुरु असले तरी त्या साठी अद्यापही काही कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे डहाणू ते वाणगाव लूप लाईन वरून गाड्या काढण्यात येत असल्याने दोन्ही बाजू कडील गाडयाना उशीर होत आहे.
सुरत शटल, डहाणू बोरिवली लोकल, अहमदाबाद पॅसेंजर, डहाणू विरार शटल, पनवेल मेमू आदी गाडया रद्द करण्यांत आल्या होत्या. त्या वेळापत्रकानुसार कधी धावतील? हे मात्र रेल्वेला दोन दिवसांनंतरच सांगता येणार आहे. कारण झालेल्या दुरुस्तीची सुरक्षा चाचणी झाल्यानंतरच तिचा वापर होणार आहे. 

सगळ्याच प्रवाशांची झाली प्रदीर्घ काळ कोंडी
सोमवारी रात्री साडे दहा वाजल्यापासून मुंबईहून सुटलेल्या अनेक लांब पल्ल्याच्या गाडया विरार ते बोईसरपर्यंतच्या विविध रेल्वे स्थानकात पहाटे पाच वाजेपर्यंत अडकून पडल्याने तसेच अनिश्चित काळा पर्यंत गाडया थांबल्याने प्रवाशांच्या हालांना पारावर नसल्याने प्रवाशानी आंदोलने केली.
पश्चिम रेल्वेवरील सर्वच लांब पल्ल्याच्या गाडयांच्या वेळा अनिश्चित असून बोईसर ते विरार दरम्यानच्या प्रवेशासाठी केवळ दोन लोकल सुरु आहेत, तर मंत्रालय व मुंबई महानगर पालिका आणि बँका आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खास असलेली बलसाड तेज पॅसेंजर रद्द आहे.

Web Title: RPF ransom, passage of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.