आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधनामुळे वाचले धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे प्राण, CCTV मध्ये थरार कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 19:22 IST2022-01-25T19:18:34+5:302022-01-25T19:22:22+5:30

वसई रोड रेल्वे फलाटावरील थरार 

RPF trooper escapes due to incident | आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधनामुळे वाचले धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे प्राण, CCTV मध्ये थरार कैद

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधनामुळे वाचले धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे प्राण, CCTV मध्ये थरार कैद

आशिष राणे

वसई रोड रेल्वे स्थानकात नुकतीच घडलेली एक थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक प्रवासी धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात असताच त्याचा तोल गेला. परंतु हा प्रवासी ट्रेन व फलाटामधील अंतरात पडण्याअगोदरच एका आरपीएफ जवानानं प्रसंगावधान दाखवत त्याचे प्राण वाचवले. २३ जानेवारी रोजी ही घटना घडली असून हा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला. यानंतर आरपीएफ जवानांच्या या धैर्याचे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जाते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवार दि २३ जानेवारी रोजी वसई रोड रेल्वे स्थानकावरून धावत्या ट्रेन मध्ये चढण्यासाठी एका प्रवाशानं प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतू शकला असता. त्याचवेळी रेल्वे फलाटावर ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानानं तत्परतेने धाव घेत त्या प्रवाशाला खेचलं, यामुळे अनर्थ टळला. या घटनेतील त्या प्रवाश्याचं आणि आरपीएफ जवानाचे नाव मात्र कळू शकले नाही.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरपीएफ जवानाच्या या प्रसंगावधानामुळे नक्कीच त्या प्रवाशाचा जीव वाचला. हा सर्व प्रकार फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला आणि तो समोर आल्यामुळेच या आरपीएफ जवानाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: RPF trooper escapes due to incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.