१ करोड ३० लाखाचे अमलीपदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:00 PM2019-08-31T23:00:17+5:302019-08-31T23:00:22+5:30
एलसीबीची कारवाई । दोघांना अटक , दुसऱ्यांदा गवसले घबाड
नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सुवी पॅलेस हॉटेल समोरील गाडीमधून एलसीबीच्या टीमने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 करोड 30 लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. गेल्या 15 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ वसईत सापडण्याची दुसरी घटना घडली असून
यामुळे वसई विरार नालासोपारा परिसरातड्रग्जमाफिया पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट होत आहे. एलसीबीच्या सहायक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे यांनी ही कामगिरी बजावली. त्यांनी धर्मेश नरेश शहा (४०) आण िशिवाजी रामशब्द तिवारी (३७) यांना ताब्यात घेतले व गाडीमधून ८२ लाख ४५ हजार रु पये किंमतीचा ४ किलो ८५० ग्रॅम अल्पाझोलम, ४५ लाखांचा ९०० ग्रॅम वजनाचा एम डी आणि इतर मुद्देमालासह असा एकूण 1 करोड 30 लाख 65 हजार 500 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीने वालीव पोलीस ठाण्यात एन डी पी एस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केले आहे.
दोन्ही आरोपीना वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- जितेंद्र वनकोटी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)