वसई विरार शहरात महापालिका आयुक्त गंगाथरन डी .यांच्या बदलीची जोरदार अफवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 03:54 PM2021-10-05T15:54:57+5:302021-10-05T15:55:17+5:30

आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये व्यस्त; जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

rumors about the transfer of Municipal Commissioner Gangatharan D. in Vasai Virar city | वसई विरार शहरात महापालिका आयुक्त गंगाथरन डी .यांच्या बदलीची जोरदार अफवा 

वसई विरार शहरात महापालिका आयुक्त गंगाथरन डी .यांच्या बदलीची जोरदार अफवा 

googlenewsNext

आशिष राणे, वसई

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन .डी यांची नाशिक येथे बदली झाल्याची जोरदार चर्चा सध्या वसई विरार मध्ये सुरू आहे. दरम्यान मंगळवारी  सोशल मीडिया व काही स्थानिक वृत्तपत्राच्या माध्यमातून पालिका आयुक्त यांची बदली नाशिक येथे झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले

 इतकंच नाही तर त्यांच्या जागी आता अप्पर जिल्हाधिकारी तथा सिडकोचे (वसाहत) महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अनिल पवार हे लवकरच विरार मुख्यालयात रुजू होणार आहेत असे ही वृत्त प्रसारीत झालं आहे. 

मात्र हे बदली बाबतचे बातमी वृत्त सत्य  आहे का यासाठी स्वतः पालिका आयुक्त गंगाथरन .डी यांना संपर्क साधून विचारले असता त्यांचा संपर्क झाला नाही किंबहुना आयुक्त गंगाथरन डी हे मागील वर्षी मार्च 2020 रोजी धुळे जिल्ह्यातुन कोरोना काळात थेट वसई विरार महापालिकेत रुजू झाले होते तर त्यांना आतापर्यंत 20  महिने वसईत झाले असून अजूनही त्यांचा कालावधी शिल्लक आहे

त्यामुळे आयुक्त यांची बदली की ही नुसती बदली ची अफवा हे मात्र प्रत्यक्षात नगरविकास खात्याचा आदेश जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत यांस अधिकृत आधार म्हणता येणार नाही

एकुणच पालिका आयुक्त यांच्या जागी सिडको प्रशासनातील वरिष्ठ पदावर असलेले तथा महसूल विभागात ही उत्तम प्रकारे सेवा बजावलेले अनिल पवार येणार अशी तर चर्चा मागील काही महिन्यांपूर्वी पासून च रंगते आहे. मात्र या दोन दिवसांत तर समाज माध्यमांनी व काही स्थानिक वृत्तपत्रानी खूपच घाई केली

विशेष म्हणजे या संपूर्ण बदली बाबतीत वसई विरार महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी मिश्किल हास्य करत शासनांकडून पालिका आयुक्त यांना कुठलेही आदेश प्राप्त झाले नसून आयुक्त गंगाथरन हे सकाळ पासून विरार  मुख्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये व्यस्त आहेत त्यामुळे ही जरी बदलीची चर्चा झाली असली तरी या अफवेला पालिका प्रशासनाने पुर्ण विराम दिला आहे

याउलट यदा कदाचित तसे आदेश आज उद्या जरी आले तरी आता वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाचे यापुढील नवे आयुक्त म्हणून कोण असतील अशा चर्चा मात्र पुढील काही दिवस  सुरूच राहतील यात अजिबात शंकाच नाही.

Web Title: rumors about the transfer of Municipal Commissioner Gangatharan D. in Vasai Virar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.