डहाणूच्या किनाऱ्यावर संशयास्पद वस्तूमुळे धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:33 AM2018-04-26T02:33:09+5:302018-04-26T02:33:09+5:30

बॉम्बशोधक पथकाने केली तपासणी : ती वस्तू धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाल्याने नि:श्वास

Runway due to suspicious objects on Dahunu shore | डहाणूच्या किनाऱ्यावर संशयास्पद वस्तूमुळे धावपळ

डहाणूच्या किनाऱ्यावर संशयास्पद वस्तूमुळे धावपळ

Next

बोर्डी : डहाणूच्या किनाºयावरील आगर लँडिंगपॉर्इंट येथे संशयास्पद वस्तू, बुधवार २५ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आढळली. ही सीलबंद वस्तू अल्युमिनीएमच्या छोट्या डब्यासारखी असल्याची माहिती उपस्थित सागरी सुरक्षारक्षक हर्षल तांडेल यांनी स्थानिक पोलीस आणि तटरक्षक दलाला दिल्यानंतर ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दुपारच्या सुमारास ठाणे येथील बॉम्बशोधक पथकाने ही धोकादायक वस्तू नसल्याचे स्पष्ट करून ती नष्ट केली.
रात्रीच्या भरती वेळी ही वस्तू किनाºयावर लागल्याचे बोलले जात आहे. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण घटना स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संशयास्पद वस्तूची पाहणी करत एक्सरे स्कॅनरच्या साहाय्याने स्कॅन करून पडताळणी केली असता ती कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वस्तू २.३० वाजेच्या सुमारास स्फोट करून ती नष्ट करण्यात आली. पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील यांनी बोलताना सांगितले सदर संशयास्पद वस्तू आॅईल कॅपेसीटर सारखी असून ती मोठ्या जहाजाचा एखादा यांत्रिक भाग असावा अशी शक्यता वर्तिवली, मात्र ती कोणत्याही प्रकारची स्फोटक व धोकादायक वस्तू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी सकाळच्या सुमारास तटरक्षक दलाचे कमांडन्ट एम. विजयकुमार, डहाणू पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पालघर एटीएस पोलीस उप निरीक्षक निवटे, हवालदार तडवी, शेख घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Runway due to suspicious objects on Dahunu shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.