ग्रामीण भागातील मोखाड्यात बोगस डॉक्टरांचे थैमान सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:13 AM2017-10-28T03:13:21+5:302017-10-28T03:13:29+5:30

मोखाडा : या तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.

In the rural areas, bogus doctors continue to do so | ग्रामीण भागातील मोखाड्यात बोगस डॉक्टरांचे थैमान सुरूच

ग्रामीण भागातील मोखाड्यात बोगस डॉक्टरांचे थैमान सुरूच

Next

रविंद्र साळवे
मोखाडा : या तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही डिग्री नसतांना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार तालुक्यातील मोखाडा शहर खोडाळा पोशेरा तुळ्याचापाडा मोखाडा लगत असलेले जव्हार तालुक्यातील न्याहाळे येथे सुरु असतांना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
मोखाडा तालुक्यात जवळपास २५८ गावपाडे असून, ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तथा उपकेंद्रात डॉक्टरांच्या दुर्लक्षित कारभारामुळे गरीब रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी हे वेळेवर हजर राहून रुग्णांवर उपचार करीत नाहीत, यामुळे अशा गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यातील बोगस आरोग्याशी खेळणारा उपचार घ्यावा लागतो.
याचाच फायदा घेऊन बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली २ ते ३ वर्ष कम्पाउंडरची नोकरी करून त्यानंतर हेच कम्पाउंडर ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरी व्यवसाय करतात, तसेच काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगिडत असलेले मात्र नियमानुसार नसलेले बोगस प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण भागात आपला डॉक्टरचा व्यवसाय करतात. या बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई होत असली, तरी अशा बेकायदेशीर उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरात जाऊन महागडा उपचार घेण्यापेक्षा जर गावातच कमी पैशात उपचार होत असल्याने अशिक्षित गोरगरीब गावातच उपचार घेतात; मात्र अनेक वेळा चुकीचा उपचार होऊन त्या रु ग्णांवर विपरित परिणाम होतो.
>तालुका अधिकारी गप्प?
बोगस डॉक्टरचा व्यवसाय करणार्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शासनाने तालुका आरोग्य अधिकाºयांवर सोपविली आहे; परंतु मोखाडा तालुक्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असताना तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी मात्र का? मूग गिळून गप्प आहेत.

Web Title: In the rural areas, bogus doctors continue to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर