परदेशी विद्यार्थ्यांनी लुटला ग्रामीण खेळांचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:49 PM2019-09-25T23:49:08+5:302019-09-25T23:49:18+5:30
विक्रमगड तालुक्यात दौरा; ग्रामीण भारतीय संस्कृतीचा करणार अभ्यास
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, ओंदे येथील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना चक्क परदेशी विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळण्याची संधी मिळाली.
अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शाळेतील विद्यार्थी भारतीय ग्रामीण भागाची संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात आले आहेत. यावेळी त्यांनी विक्र मगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा ओंदे येथील विद्यार्थ्यांसोबत विविध मराठमोळ्या क्रीडा स्पर्धात सहभाग घेतला. यात दोरीच्या उड्या, खो-खो यांसह अन्य खेळांचा समावेश होता. यावेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांची शिस्त बघावयास मिळाली. यावेळी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अमेरीकन विद्यार्थ्यांसमोर एक सुरात कवितेचे सादरीकरण केले.
ओंदे गावातील विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संखेने जमली होती. ती आपल्याला मुलांना या स्पर्धेत प्रोत्साहन देत होते. यावेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांकडून आत्मविश्वास, शिस्त, मोकळेपणा, धाडस, सातत्य अशा अनेक गोष्टी आपल्या मुलांना शिकायला मिळाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नईमार्फत अमोल देशपांडे, शरद खोचरे, सागर कांबळे, परेश कोळी, जेसीका जे, लुका, हे उपस्थित होते.
अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शाळेतील अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा ओंदे येथे भेट दिली. यावेळी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत विविध क्र ीडा स्पर्धा लावून अमेरिकेतील तेथील शिक्षण पद्धती त्याचा विद्यार्थ्यांमधील क्षमता, आत्मविश्वास, त्याची शिस्त, मोकळेपणा याविषयी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे अमेरिकेतील विद्यार्थ्यांनीही आपली शिक्षण पद्धत व क्र ीडा स्पर्धा जाणून घेतल्या व आंनद लुटला.
- अजित भोये (मुख्याध्यापक, जि. प. शाळा ओंदे)