शिधावाटप संकटात
By admin | Published: August 3, 2015 03:39 AM2015-08-03T03:39:58+5:302015-08-03T03:39:58+5:30
राज्य शासनाच्या ‘द्वार पोहोच योजने’च्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. येत्या महिन्याभरात ही योजना सुरू झाली नाही
चेतन ननावरे , मुंबई
राज्य शासनाच्या ‘द्वार पोहोच योजने’च्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. येत्या महिन्याभरात ही योजना सुरू झाली नाही, तर शासकीय गोदामातून माल न उचलण्याचा निर्णय मुंबई आणि ठाण्यातील दुकानदारांनी घेतला आहे. तसे झाल्यास ज्यांचे घर रेशनिंगच्या धान्यावर चालते, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ‘मुंबई रेशनिंग दुकानदार संघटने’चे अध्यक्ष नवीन मारू यांनी सांगितले, शासकीय गोदामांपासून दुकानांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी वर्षभरापूर्वी
‘द्वार पोहोच’ योजना सुरू करण्यात आली. त्यात गोदामांपासून दुकानांपर्यंत धान्य पुरवठा करण्याचे काम शासनाचे होते. राज्यातील काही भागांत ही योजना सुरू झाली, मात्र ज्या मुंबई आणि ठाणे या शहरांत वाहतुकीसाठी सर्वाधिक खर्च होतो तिथे योजना सुरू करण्यात शासन दिरंगाई करत आहे. आॅगस्टमध्ये वाटण्यात येणारा रेशनिंगचा माल दुकानदारांनी जुलै महिन्यात शासकीय गोदामातून उचलला आहे.