साबुदाणा, दाणे, लिंबे भुईमुगाच्या शेंगा आषाढीला स्वस्त, बाकी सारे महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:20 AM2019-07-12T00:20:35+5:302019-07-12T00:20:41+5:30
खवैय्यांची यंदा चंगळ : फलाहारींना मात्र बसणार महागाईचा काहीसा झटका
भवानी झा
ठाणे : या आषाढी एकादशीला साबुदाणा, शेंगादाणे गतवर्षीपेक्षा स्वस्त झाले असून बाकी सर्व फराळाला लागणारी सामग्री व फळे महागली आहेत. सर्वसामान्य घरामध्ये साबुदाण्याची खिचडी अथवा वडे आणि तसेच मोठया प्रमाणात वापरले जाणारे शेंगदाणे स्वस्त झाल्याने गृहिणी समाधानी आहेत.
गतवर्षी आषाढीला १२० रू. किलो असणारा साबुदाणा यंदा ९८ रू. किलो, १४० रू. किलो असणारा शेंगादाणा ११० रू. कि., ९० रू. किलो असणारा गावठी गूळ ८० रू.किलो, देशी तूप गतवर्षी ५२० रूपये किलो होते ते यंदा ४९० रू. किलो आहे. ६० रू. डझन असणारे लींबू ५० रू. डझन
या दराने उपलब्ध आहे. म्हणजे तुलनात्मक रित्या स्वस्त झाले आहे. खजूर किलोमागे ४० ते ५० रू. सिडलेस खजूर प्रतिकिलो २० रूपयाने, भगर प्रतिकिलो २६ रूपयाने, राजगीरा प्रतिकिलो १२ रूपयाने डालडा प्रति किलो १० रूपयाने महाग झाले आहे. उपवासाला सर्वाधिक वापरले जाणारे फळ म्हणजे केळी, ते डझनामागे २० रुपयांनी महागले आहे. तर सफरचंद २०० ऐवजी २५० रुपये किलोने उपलब्ध आहेत. खरबूज आणि पपई सगळ्यात स्वस्त असून त्यांच्यात मात्र १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.
हे झाले स्वस्त
किराणा पदार्थ आधीचे दर आताचे दर
साबुदाणा १२० ९८
शेंगदाणा १४० ११०
गावठी गूळ ९० ८०-८५
लिंबू ४०-६० ५०
हे झाले महाग
खजूर ४०० ४४०-५०
सीडलेस खजूर ३४० ३६०
भगर ६०-७० ९६
राजगीरा ९८ ११०
साखर ३८ ४०
गूळ ४० ६०
गावराण तूप ५२० ४९०
डालडा ७०-८० ९०
दही १२० १३५
रताळी, बटाटे, मिरच्या महाग
भाज्या आधीचे दर आताचे दर
मोठी रताळी ६० ७०-८०
गावरान रताळी ४० ५०-६०
शिंगाडा - -
भुईमुगाच्या शेंगा ५० ४०
हिरवी मिरची ५० ४०
बटाटे २० ३०
कोथींबीर (जुडी) २० १००