कला, क्रीडा महोत्सवाचे सचिनच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:57 AM2018-12-26T02:57:40+5:302018-12-26T02:57:56+5:30
वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरीकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व अंगभूत क्रीडा कौशल्यास संधी देण्याच्या हेतूने वसईत गेली २९ वर्षे आयोजित होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी भारतरत्न क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.
वसई : तालुक्यातील विद्यार्थी व नागरीकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व अंगभूत क्रीडा कौशल्यास संधी देण्याच्या हेतूने वसईत गेली २९ वर्षे आयोजित होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी भारतरत्न क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.यावेळी महापौर रूपेश जाधव व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान आमदार हितेंद्र ठाकूर भूषविणार असून कार्यक्र माला प्रमुख अतिथी वसई विरार मनपा आयुक्त सतीश लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते विरार येथे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन होणार आहे. माजी महापौर प्रविणा ठाकूर, आमदार विलास तरे,माजी खासदार बळीराम जाधव,माजी महापौर राजीव पाटील,माजी महापौर नारायण मानकर उद्घाटन स्थळी अतिथी म्हणून हजर रहाणार आहेत.
कला , क्र ीडा विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करणाºया शाळा वा संस्थांना स्वतंत्र चषक तर दोन्ही प्रकारात गुणांची सर्वोच्च कमाई करणाºया शाळा किंवा संस्थेस सर्वसाधारण विजेतेपदाचा मोठा चषक प्रदान करण्यात येणार आहे. एकांकिका, विविध क्र ीडा स्पर्धा, रंगावली व हस्तकला प्रदर्शन, लघुचित्रपट स्पर्धा तसेच आ जरा नचले या स्पर्धांचे उद्घाटन यावेळी होणार आहे. यंदाच्या या महोत्सवात बास्केटबॉल, रिंग फूटबॉल स्पर्धा व कला विभागात स्वरचित कविता वाचन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.
बक्षिसांची प्रचड लयलूट
विजेते, उपविजेते संघ, वैयक्तिक विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व ब्राँझ पदके, उत्तेजनार्थ कलावंत व क्र ीडापटूंना एकूण सहा हजारांपेक्षा अधिक प्रमाणपत्रे, 750 सुवर्ण, 750 रौप्य व 750 ब्राँझ पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. सांघिक स्पर्धांसाठी रोख बक्षिसेही आहेत.