शाश्वत ग्रामने कुटुंबांचे भाग्य उजळले
By admin | Published: April 1, 2017 11:29 PM2017-04-01T23:29:58+5:302017-04-01T23:30:10+5:30
हिंदुजा फाउंडेशनच्या शाश्वत ग्राम विकास प्रकल्पामुळे या तालुक्यातील २००८ कुटुंबांचे जीवन उजळले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा
हुसेन मेमन , जव्हार
हिंदुजा फाउंडेशनच्या शाश्वत ग्राम विकास प्रकल्पामुळे या तालुक्यातील २००८ कुटुंबांचे जीवन उजळले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा, पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन, सुधारित शैक्षणिक सुविधा, महिलांच्या सबलीकरणासाठी प्रशिक्षण आणि गावातील पायाभूूत सुविधांचा विकास आदींद्वारे त्यांच्या जीवनमानात सुधारणा या प्रकल्पाद्वारे घडवून आणल्या जातात.
२०१५ साली हिंदुजा फाउंडेशनने येथील लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या प्रकल्पासाठी जव्हार, पिंपळशेत, ओझर, तिलोंडे आणि चांभारशेत अशा पाच गावांची निवड करण्यात आली.
हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांच्या बहुतांशी जमिनी कोरडवाहू असून वर्षातून केवळ एक पीक घेता येत होते. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न फारच कमी होते. रोजगाराच्या शोधार्थ ते गावोगाव भटकत होते. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंदुजा फाउंडेशनने मोगरा लागवडीचा प्रयोग केला सहा महिन्यांमध्ये शेतकयांना अतिरिक्त उत्पन्न त्याद्वारे मिळून १८१ कुटुंबांचा फायदा झाला त्यांचे स्थलांतरण थांबले. मोगरा शेतीसाठी फाऊंडेशनने ४,३७,३८८ रूपयांचे सहाय्य केले आहे.
त्यामुळे उत्साहित होऊन फाउंडेशनने भाजी व कलिंगड लागवड सुरु केली. त्यासाठी २,२३,०३५ रुपयांचे सहाय्य करण्यात आले. त्याचा विनियोग बि-बियाणे-खत पुरवणे याबरोबरच पाण्याचे पंप बसवणे, तात्पुरते बंधारे घालणे यासाठी केला गेला. तसेच सौर ऊर्जेवरील पिण्याच्या पाण्याचा प्रकल्पही सुरू केला, यामुळे स्थानिकांना पाणी उपलब्ध झाले. त्यांची फिरफिर थांबली व गावातील २३५ कुटुंबांनी शेती सुरू केली आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळवू लागले. भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना फाउंडेशन शिलाई मशीन आणि घरघंटीही देण्यात आलेल्या आहेत त्यातूनही स्वयंरोजगार निर्माण झाला आहे.
ग्रामीण विकास प्रकल्पातील महत्वाचे मुद्दे
हिंदूजा फाऊंडेशनकडून ग्रामीण विकास प्रकल्पाच्या कामांसाठी आतापर्यंत जवळजवळ ९.९६ करोड रु पये निधी खर्च झालेला आहे.
हिंदूजा फाऊंडेशनकडून जून २०१५ ते २०२७ या कालावधीसाठी पिंपळशेत, ओझर, खरोंडा, तिलोंढे आणि चांभारशेत अशी आहेत.
तसेच, मे, २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी आक्रे, सकोड, देवगाव, आळ्याचीमेट, बरवडपाडा, ज़गदा, दाज़ेसे, पिंपर्न, खंबाळे, तलासरी, किरमिरे, साखरशेत आणि उंबरखेडा ही नवी १३ गावे द्त्तक घेतली आहेत.
तसेच क्र ांती जोती माध्यमिक आश्रम शाळा, चांज़रशेत, सरकारी आश्रम शाळा, ओझर, , पिंपळशेत , चांभारशेत, येथील जिल्हा परिषद शाळा व खुंदाचापाडा येथील एक अशा पाच शाळाही दत्तक घेतलेल्या आहेत.
फाऊंडेशनने शिंगारपाडा येथे पाण्याची टाकी उभारली असून आली आहे, खंरोडा गावठाण, हेदीचा पाडा, आणि ओझर गावठाण या ठिकाणी टाकी उभारण्याचे काम चालू आहे. या कामांना यशस्वी करण्याकरीता हिंदुजा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शहा ब्रिगेडीयर एच. चुकरबुती -कार्यकारी उपप्रमुख, फ्रेडी मार्टिस, वरिष्ठ विकास व्यवस्थापक व इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.