साहिल फसला दलदलीत? चार दिवस मोहीम अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:16 AM2018-09-29T04:16:54+5:302018-09-29T04:18:01+5:30

गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे.

 Sahil is ineffective? The four-day campaign failed | साहिल फसला दलदलीत? चार दिवस मोहीम अयशस्वी

साहिल फसला दलदलीत? चार दिवस मोहीम अयशस्वी

googlenewsNext

- हितेन नाईक
पालघर - गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न गुरुवारी सकाळी कोस्टगार्डचे पाणबुडे, पोलीस आणि स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून केला. मात्र या सर्वाना रिकाम्या हाताने परत फिरावे लागल्याने साहिलच्या कुटुंबियांची चिंता वाढू लागली आहे.
तालुक्यातील घिवली येथून आपल्या आई, बाबा, बहीण आदी सोबत कफपरेड येथे मामाकडे जाऊन त्यांच्या राजधानी बोटीतून लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गेलेली ही बोट दुसºया बोटीशी टक्कर झाल्याने उलटून झालेल्या अपघातानंतर त्याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. साहिल त्याची आई नीता आणि बहीण त्रिवेणी बोटीतून पाण्यात पडल्यानंतर आपण स्वत: साहिल याला वाचवीत बोटीवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या हातात दिल्याचे नीता यांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात साहिल दिसल्याचे कुठे आढळून आले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे साहिल पाण्यात बुडाला? की त्याला कोणी उचलून नेले या बाबत पोलीस आणि प्रशासनामध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे?
घटनेला पाच दिवस झाले असतांना साहिल याचा शोध लागत नसल्याने पोलीस आणि प्रशासनावरचा ताण वाढत चालला होता. साहिलचा बुडून मृत्यू झाला असावा? बुडाला असल्यास चार दिवसा नंतर ही त्याचा मृतदेह कुठे आढळला नाही? मग त्याचे पार्थिव विसर्जन केलेल्या हजारो गणेश मूर्त्यांच्या आत अडकले तर नसावे? अशा शंका व्यक्त होत असतांना गुरुवारी घटना स्थळी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

मिळाला आयफोन

कोस्टगार्डचे अरु ण एम, पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक यादव, साहिलचे वडील जयेश, मामा भोईर, घिवलीचे ग्रामस्थ नयन व दीपेश तामोरे, राजेश घरत कोस्टगार्डचे सहा पाणबुडे यांनी सकाळी ११ वा. मोहिमेला सुरु वात केली. ती दुपारी १ वाजे पर्यंत सुरू होती. घटनास्थळा जवळ पाण्यात एक आयफोन तेवढा मिळाला.

Web Title:  Sahil is ineffective? The four-day campaign failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.