मंगळवारी साईधामचा वर्धापनदिन ; तयारीला झाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:03 AM2019-02-11T00:03:26+5:302019-02-11T00:03:54+5:30
मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे.
वसई : विरार पश्चिम, गावठाण रोड येथे असलेल्या ओम श्री साईधाम मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन सोहळा १२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. समस्त विरारवासीयांसाठी मायेची सावली देणारे कृपाछत्र अशी किर्ती असलेल्या या साईनाथांच्या मंदिर वर्धापनिदनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे तसेच भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकड आरती, श्रींचेमंगलस्नान महा अभिषेक, मंगल आरती, ग्रहयज्ञ, सत्यनारायण महापूजा, मध्यान्ह आरती, भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे.
विरार पश्चिमेला गावठाण येथे १२ फेब्रुवारी १९८७ रोजी या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. मागील काही वर्षात मंदिर वर्धापन दिन सोहळा हा विरारचा जणू उत्सव बनून गेला आहे. गेल्या ३१ वर्षांत ओम श्री साईनाथ मंदिर ट्रस्टने अनेक धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक उपक्र म मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत. आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टमार्फत वर्षभर सुरू असते.
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून वर्धापनिदनाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद हा साईभक्तांनी आपल्या घरी बनविलेल्या प्रासादातून देण्यात येतो. विविध जाति-धर्माचे साईभक्त आपला पारंपारिक वेष परिधान करु न यावेळी उपस्थीत असतात. साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरार पश्चिम गावठाण परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात येत असते. राजकिय नेते मंडळी, हिंदी-मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत अभिनेते, मराठी कलाकारांची उपस्थिती प्रतिवर्षी असते. भजन संध्या व संगीत रजनीसाठी हजारो लोक उपस्थित असतात. विरार पश्चिम स्टेशन ते मंदिरापर्यंतच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.
ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट मार्फत विविध उपक्रम पालघर जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही राबविले जात आहेत.
श्री साईधाम मंदिर ट्रस्टचे उपक्र म
सन २००८ साली ट्रस्टच्या मार्फत शिर्डी येथील निमगांव, निघोज येथे भव्य स्वरूपात पालखी आणि पदयात्रींसाठी साई पालखी निवारा बांधण्यात आला आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यातून तसेच संपूर्ण देशभरातून साई पालखी निवारा येथे आतापर्यंत हजारो साईनाथांच्या पालखींचे आगमन व लाखो पदयात्री भक्तांनी निवासाचा लाभ घेतला आहे. या निवाºयात शिर्डीत पालखी आणि पदयात्रेतून येणाºया भाविकांची चहा, नाश्ता, जेवण, निवास तसेच आंघोळीसाठी गरम पाणी अशी सोय विनामूल्य केली जाते. येणाºया भाविकांना आध्यात्मिक मनशांती अनुभवण्यासाठी ध्यानकेंद्र, प्रशस्त गोशाळा, देशी-विदेशी पक्षांसाठी आधिवास क्षेत्र, अद्ययावत मत्स्यालय, उद्यानात मुलांसाठी खेळाचे साहित्य उभारण्यात आले आहे. पालखी निवारा परिसरात शंकर, पंचमुखी हनुमान, महादेव, विठ्ठल व गणेशाच्या भव्य संगमरवरी मूर्त्या आहेत.