शिक्षकांच्या बदल्या मनमानी, सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:31 AM2017-07-29T01:31:58+5:302017-07-29T01:32:06+5:30
जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत
पालघर : जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत. त्या मध्ये मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि उपशिक्षकांची ७ हजार १०३ पदं मंजूर असून त्यापैकी ६ हजार ४३८ कार्यरत असल्याने ६६५ रिक्तपदं आहेत. विकल्पानुसार २४९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्यापैकी केवळ २२६ शिक्षक हजर झाल्याने २३ जागा आजही रिक्त आहेत. जिल्हा निर्मितीला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतांना या आदिवासी जिल्ह्यात शिक्षकांची सर्व पदं भरलेली नाहीत. या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्ह्याचे शिक्षण समिती सभापती सचिन पाटील सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र ग्राम विकास विभागाचच्या आदेशानुसार २२९ शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी गुरु वारी त्याची अंमलबाजवणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही अमलबजावणी झाल्यास केवळ ४९ शिक्षक परजिल्ह्यातून येणारे असतील. त्यामुळे आठ तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही शासन निर्णयाच्या अंमलबजावणी आधी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्र वारच्या स्थायी समिती सभेत सदर शासन निर्णयाची अंमलबाजवणी न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून जिल्हा शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केल्याचे लोकमतला सांगितले. जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदं रिक्त असताना हा निर्णय शैक्षणिक धोरणाला मारक आहे.शिवाय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाचे अधिकारी निर्णय घेत असल्याने स्थायी समितीच्या सभेतून अध्यक्षासह सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपलं निषेध नोंदविला आहे.