आदिवासींना दिला सडका गहू

By admin | Published: September 2, 2016 03:35 AM2016-09-02T03:35:41+5:302016-09-02T03:35:41+5:30

डहाणू तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला असून तो जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नसल्याने कार्ड धारकांनी तो रस्त्यावर फेकून

Salted wheat provided to tribals | आदिवासींना दिला सडका गहू

आदिवासींना दिला सडका गहू

Next

- सुरेश काटे, तलासरी

डहाणू तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला असून तो जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नसल्याने कार्ड धारकांनी तो रस्त्यावर फेकून पुरवठा विभागाचा निषेध केला. हा सडलेला गहू पुरवठा करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
धान्य गोदामांमध्ये असलेला अंत्योदय योजनेचा गहू सडलेला आहे हे माहित असतांना डहाणूच्या पुरवठा विभागाने तो लाभार्थ्यांना विक्री करण्या करिता रेशन दुकानदारांना दिला. हा गहू खरेदी केल्यावर तो जनावराच्याही खाण्याच्या लायकीचा नाही हे दिसून आल्यावर संतापलेल्या आदिवासींनी तो रस्त्यावर ओतून शासनाचा व पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त केला.
हळद पाडा येथील आदिवासी लाभार्थी सुरेखा जयवंत रावते (सरपंच), सविता सखाराम बीज , रमेश वनजी सवरा, विनता सुनील कोम, वंदन रु पजी घोरखाना, संगीता रामा डोल्हारे, गुलाब सखाराम भावर, दत्तू जाना उमतोल, संदीप सावजी दळवी, रमेश जाना रावते, जानी माणिक दळवी, लता नवश्या वरठा, लाडकी देऊ रावते, नवशी जयराम दुमाडा, संगीता देऊ दळवी, जस्वती विष्णू रावते, मीना मनू रावते, नाणू जाणू उमतोल आदी सह अनेक कार्ड धारकांनी सडके धान्य रस्त्यावर ओतले.

खराब धान्याचे पंचनामे करण्यास सांगितले आहे.
- प्रितीलता कौरती, तहसीलदार.

गहू खराब आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी याना कळविण्यात आले आहे.
- गायकवाड, गोदाम पालक, डहाणू.

रेशन दुकानातील हा गहू आमचे जनावरे देखिल खात नाहीत इतका निकृष्ट आहे.
- सुरेखा रावते, सरपंच

Web Title: Salted wheat provided to tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.