‘गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणाऱ्या तुझ्या कष्टाला माझा सलाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:52 AM2019-04-20T00:52:22+5:302019-04-20T00:52:26+5:30
मी आज हजारो अनाथांची माय म्हणून सर्वत्र परिचित असली तरी माझ्या या कार्याला मोठा टेकू(पाठबळ) देण्यासह जिल्ह्यातील गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणा-या तुङया कष्टाला माझा सलाम आहे
पालघर : मी आज हजारो अनाथांची माय म्हणून सर्वत्र परिचित असली तरी माझ्या या कार्याला मोठा टेकू(पाठबळ) देण्यासह जिल्ह्यातील गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणा-या तुङया कष्टाला माझा सलाम आहे असे गौरवोद्गार अनाथांची माय म्हणून परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी निलेश सांबरे यांच्याबद्दल काढले.
निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कला, क्रीडा नगरीत उभारलेल्या व्यासपीठावर मंगळवारी हजारो अनाथांची माय बनलेल्या सिंधुताई सपकाळ आणि पालघर-ठाणे जिल्ह्यातील वंचित घटकासाठी झगडणाºया निलेश सांबरे यांना जन्माला घालणारी माय असलेल्या भावनादेवी सांबरे या एकत्र उपस्थित होत्या.
रस्त्यावरच्या कचºयात फेकलेल्या, कुत्र्यांनी लचके तोडलेल्या, विहिरीच्या कठड्यावर ठेवून पसार झालेल्या अशा हजारो मुलांचा सांभाळ मी आज करीत असून मी ४९ सुनांची सासू,मला २८२ जावई, ३५० गाईची आई बनली असून ७५० पुरस्कार, ४ राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मी गंभीर आजारी असताना माझ्या लेकरांनी मी मरू नये म्हणून अनाथालयात दिवा लावला, देवापुढे दिवा लावला की आई मरत नसते या भाबड्या समजुतीने लावलेला हा दिवा आजही सतत जळत आहे, कारण ह्या दिव्यातील तेल निलेशचे असल्याचे सांगून ही पणती कधीही विझणार नाही याची काळजी निलेश घेत असल्याचे सांगून परमेश्वर तुला नक्कीच दीर्घायुष्य देईल असा विश्वास सिंधुतार्इंनी व्यक्त केला.
आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील विकासकामे शासकीय निधीचा वापर करून केल्यावरही आपण त्यांचा उदोउदो करतो. मात्र निलेश सांबरे यांनी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या फायद्याच्या पैशांमधून गरिबांसाठी उभारलेले रुग्णालय, जिल्ह्यात रुग्णवाहिनीचे पसरलेले जाळे, विनामूल्य शिक्षणासाठी उभारलेली शाळा-महाविद्यालय, उच्चशिक्षित अधिकारी बनविण्यासाठी उभारलेली अकॅडमी ह्या सर्वसामान्यांच्या हितासाठी निस्वार्थीपणे उभारलेले कार्य इथल्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असल्याचे स्पष्ट मत व्यासपिठावरून व्यक्त करण्यात आले.