पालघरमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: August 14, 2022 08:09 PM2022-08-14T20:09:48+5:302022-08-14T20:11:26+5:30
जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी होतात्म्य आले होते.
पालघर - ब्रिटीश साम्राज्याविरोधात चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी होतात्म्य आले होते.
आज हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वनगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संदीप जाधवर, प्रांतअधिकारी धनाजी तुळसकर, तहसिलदार सुनिल शिंदे, विविध विभागाचे अधिकारी वर्ग, हुतात्मा यांचे नातेवाईक, नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.