गावांना हाेणार समदाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 11:38 PM2021-03-03T23:38:55+5:302021-03-03T23:38:58+5:30

सफाळे येथे आयआयटी मुंबईचा प्रकल्प : देशातील पहिलाच प्रयाेग

Samadaba water supply to the villages | गावांना हाेणार समदाबाने पाणीपुरवठा

गावांना हाेणार समदाबाने पाणीपुरवठा

Next



हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर/सफाळे : अनेक वर्षांपासून अडचणीत असलेली उंबरपाडा नंदाडे १७ गावे पाणीपुरवठा योजनेला पुनरुज्जीवित करून शेवटच्या गावापर्यंत समान दाबाने पाणी पोहाेचण्यासाठी सफाळे ग्रामपंचायतीने आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने पुढाकार घेतला होता. कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दबाने पाणीपुरवठा करण्याचे तसेच अत्यंत कमी जागेत उभी राहणारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केंद्रीय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने केली आहे.
सफाळे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करवाळे धरणातून उंबरपाडा नंदाळे १७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतल्यानंतर २००३ मध्येे ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या योजनेत उंबरपाडा, सफाळे, कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रुक, जलसार, करवाळे, नवघर, वाढीव आदी गावांचा समावेश करण्यात आला होता. अनेक गावांत पाणीच पोहोचत नसल्याची ओरड होत असल्याने आयटीचे प्रोफेसर डॉ. प्रदीप काळबर यांना सफाळे ग्रामपंचायतीने पाचारण केले होते.
त्यांनी या योजनेचा अभ्यास करून ५० हजार ते एक लाख लीटर क्षमतेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाण्याच्या टाकीला १० ते २० लाखांचा येणाऱ्या खर्चात बचत करून पाणी पुरवठा करण्यासाठी 'शाफ्ट' ही दोन पाइपमधली व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'खांब' या तंत्रज्ञानाचा वापर डॉ. काळभोर यांनी केला. अवघ्या सुमारे दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील तीन जलवाहिन्यांना शाफ्ट, मनिफॉल्ड व मास्टरपीस अशी उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. गावात निर्माण होणारी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची प्रकल्प सफाळे ग्रामपंचायतीने हाती घेतला असून पाण्याचा समग्र व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सफाळे उंबरपाडा ही ग्रामपंचायत संपूर्ण जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञानाचा जिल्ह्यात अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे आयआयटीचे प्रा. प्रदीप काळबर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

केंद्रीय पाणीपुरवठा विभागाच्या संचालकांची शिफारस
खांबाच्या आकाराचा शाफ्ट कमी खर्चात उभारून सर्व वाहिन्यांवर समदाब निर्माण करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान देशात पूर्वापार जायचे. त्याचे अनुकरण व प्रात्यक्षिक सफाळे येथे करण्यात आले. या तंत्रज्ञानाचा सर्व ग्रामीण नळपणी योजनांमध्ये वापर करावा, असे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संचालकाने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे.

Web Title: Samadaba water supply to the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.