सामवेदी ख्रिस्ती कुपारी तरुणाई सज्ज
By Admin | Published: December 24, 2016 02:35 AM2016-12-24T02:35:58+5:302016-12-24T02:35:58+5:30
वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळातर्फे पाचवा कुपारी संस्कृती महोत्सव सोमवारी वाघोली येथील खुल्या शिवारात संपन्न
शशी करपे / वसई
वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळातर्फे पाचवा कुपारी संस्कृती महोत्सव सोमवारी वाघोली येथील खुल्या शिवारात संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या तयारीसाठी हायटेक तरूणाई तब्बल महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्याव्दारे मेहनत घेत असून यंदाच्या महोत्सवाला वीस हजार समाजबांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे़.
सामवेदी बोलीभाषा आणि संस्कृती टिकून रहावी म्हणून पाच वर्र्षांपूर्वी समाजातील उच्च शिक्षित तरूणांनी एकत्र येऊन याची सुरूवात केली. मुळात शेती, बागायती आणि दुभदुभत्याचा व्यवसाय करणारा हा शेतकरी समाज. सामवेदामुळे संगीत हा या समाजाचा स्थायीभाव़ धर्म ख्रिस्ती असला तरीही लोकगीतातून कृष्ण आणि राधा हिच प्रतिकं लग्नापासून सर्वच सणासमारंभात वापरली जात होती. रहाटाच्या पाण्याने शेती बागायतीचं़ शिंंपण व्हायचं़ दांडातून पाणी जायचं त्यावर रचलेली लोकगीतं असू द्या. किंवा नवरदेवाला सजविण्याची वेळ असू द्या. सर्वत्र सामवेदी संस्कृती आणि त्याच कृृृृृृृृषी संस्कृतीतून आलेली प्रतिकं दृष्टिस पडायची.
धोत़र, सदरा, काळं जॅकेट आणि त्यावर लाल टोपी हा पुरूषांचा पेहराव तर लाल लुगडं आणि पोवळयांचा दाागिना हा स्त्रियांचा साजश्रृंगार. कोकणीच्या जवळ जाणारी मराठी भाषेची बोलीभाषा असलेली सामवेदी बोली अशी हया समाजाची ओळख होती. तोच समाज मागच्या चाळीस पन्नास वर्र्षात प्रचंड नागरीकरण व आधुनिकीकरणामुळे आमूलाग्र बदलून गेला. आईच्या दुधातून झिरपत आलेल्या बोलीभाषेची लाज वाटू लागली. मात्र, त्याविरोधात काही वर्षांंंपासून जगभरात जनजागरण होत असून पुन्हा मुळाकडे जाण्याचा प्रयत्न सर्वच मानवसमूह करीत आहेत.
आमच्या बोलीभाषेचा आम्हाला अभिमान आहे. आमची संस्कृती मोलाची आहे म्हणूनच संस्कृतीचा गौरव करण्यासाठी तरूण पुन्हा एकत्र आले आणि त्या निमित्ताने जो महोत्सव साजरा होत असतो त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मि़ळत असतो. संस्कृती दिंडीने कुपारी महोत्सवाची सुरूवात होते. पारंपारिक वेषात संपूर्ण समाज एकत्र येतो. दिंंडीच्या मध्यभागी बैलगाडी असते . हा एका अर्थाने कृतज्ञता सोहळाच कारण बैलाच्या श्रमावरच समाजाचं भरणपोषण झालेलं आहे. महोत्सवात सांस्कृतिक चित्रे व वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातात. स्थानिक ख्रिस्ती समाजातले देशविदेश पातळीवर गाजलेले चित्रकार आपल्या उत्तोमोत्तम कलाकृती येथे सदर करतात. त्यानिमीत्ताने पुन्हा एकदा इतिहासाचा धांडोळा घेतला जातो . मुळात सामवेदी हिंंदु असलेला हा समा़ज पण त्यांच्या आयुष्यात येशू आला आणि अनेक संदर्भ बदलले.
सामवेदी ख्रिस्ती संस्कृतीचे मनोहारी चित्र या महोत्सवात आपल्याला पहायला मिळते. खाद्यजत्रा हे तर महोत्सवाचं विशेष आकर्षण असते. सामवेदी समाजाचे अनेकाअनेक वैशिष्टयपूर्ण खादयपदार्थ येथे पाहायला मिळतात. ब्रासबँड ही वसईची खास ओळख आहे. तालवाद्यांवर हुकूमत असलेले अनेक कलावंत हया मातीने दिलेले आहेत. सोमा राणेक़र पॅट्रिक मोतकरास आणिं रूमाव या बँड कंपन्यांनी नाव कमावले आहे. सॅक्सॉफोन, ट्रंम्पेट आदी वादयावर हुकूमत असलेले आणि नोटेशन शिवाय या वादयांचा वापर करणारे हे प्रतिभावंत कलाकार म्हणजे हया संपूर्ण परिसराची श्रीमंतीच आहे.त्याच ब्रासबँडची कला या महोत्सवामध्ये सादर होत असते. सोहळयाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे प्रत्येक वर्षी समाजातील गुणवतांचा येथे सन्मान करण्यात येतो.
नाताळानंतरची एक संध्याकाळ संपूर्ण समाज एकत्र येतो आणि आपली भाषा व संस्कृतीचा गौरव करतो हि अपूर्व घटना असते. हा जरी एका समाजाचा उत्सव असला तरीही पाहुण्यांना येथे मुक्तव्दार असते. या, पहा, अनुभव घ्या आणि येथून प्रेरणा घ्या हीच आयोजकांची भूमिका असते. संपूर्ण तरूणाई महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्यांव्दारे कामाला लागलेली असते. कुपारी संस्कृती महोत्सव म्हणजे एक आनंदसोहळ असतो. संपूर्ण जगभरात असलेला वसईकर आ आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे हया सोहळयचा साक्षीदार झालेला असतो.