रेती माफीयांचा डहाणूत धुमाकूळ

By admin | Published: February 15, 2017 04:29 AM2017-02-15T04:29:15+5:302017-02-15T04:29:15+5:30

डहाणूतालुक्यात आगवण, सावटा, आगर, चिखला, चिंचणी, गुंगवाडा, वाढवण, धाकटी डहाणू, उर्से या भागात दररोज पहाटे रेतीचे ट्रक

Sand mafia trousers | रेती माफीयांचा डहाणूत धुमाकूळ

रेती माफीयांचा डहाणूत धुमाकूळ

Next

डहाणू : डहाणूतालुक्यात आगवण, सावटा, आगर, चिखला, चिंचणी, गुंगवाडा, वाढवण, धाकटी डहाणू, उर्से या भागात दररोज पहाटे रेतीचे ट्रक भरु न अवैधरित्या जात असताना कारवाई होत नसल्याने महसूल आणि पोलीस यांच्या संगनमताने डहाणूत रेतीमाफीयांनी धुमाकुळ घातला आहे.
अनेकांनी या बेकायदेशीर व्यवसायाला आपल्या उदरिनर्वाहाचे साधन बनवले असून त्यामुळे पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होत आहे. तर गेल्या दोन-तीन महिन्यापासून महसूल विभागाच्या उदासीन धोरणामुळे राजरोस रेती वाहतूक सुरु आहे.
तर चिंचणी येथील एका रेतीमाफियाने उंबरगाव येथे रेतीचा साठा केला असून गुजरातची रेती पहाटेच्या सुमारास चिंचणी परिसरात एक ट्रक रेतीची २७ हजाराला विक्र ी केली जात आहे. सावटा, आगवण येथील खाडीत पहाटेच्या सुमारास बेसुमार वाळू उपासा सुरु असल्याने पोलीस आणि महसूल खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान गुजरात येथील रेतीने भरलेले ट्रक मुंबई अहमदाबाद हायवे हून येत असतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून तीन दिवसापूर्वी कासा पोलीस ठाण्यात जप्त केली आहेत. तसेच चिखला येथेही रेती काढण्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाच सहभाग असल्याची चर्चा आहे. याचाच अर्थ पोलीस आणि महसूल खात्याकडून या बेकायदेशीर रेती व्यवसायाला वरदहस्त लाभल्याचे दिसून येते. (वार्ताहर)

Web Title: Sand mafia trousers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.