वाळू माफियांच्या ९ होड्यांना जलसमाधी!

By admin | Published: February 22, 2017 05:56 AM2017-02-22T05:56:06+5:302017-02-22T05:56:06+5:30

दोन तालुक्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या पिंजाळ नदीचे अस्तित्व माफियांकडून होणाऱ्या बेछूट रेती उपशामुळे

Sand Mafia's 9 ships! | वाळू माफियांच्या ९ होड्यांना जलसमाधी!

वाळू माफियांच्या ९ होड्यांना जलसमाधी!

Next

वाडा : दोन तालुक्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या पिंजाळ नदीचे अस्तित्व माफियांकडून होणाऱ्या बेछूट रेती उपशामुळे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतांना प्रांतअधिकारी व तहसीलदार यांनी माफियांच्या ९ होड्यांना जलसमाधी दिली.
पिंजाळ नदी ही वाडा व विक्र मगड तालुक्यांची बारमाही जलवाहिनी असून तिला वाळू तस्करांचे ग्रहण लागले आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्र ारी केल्या तसेच सातत्याने अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्या. परंतु कारवाई झाली नव्हती. प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर, तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे हे पिंजाळ नदीची पाहणी करीत असतांना काही जण होड्यांमध्ये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सरकारी गाडी पाहताच त्यांनी जंगलात पळ काढला. या पथकाने वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या नदीपात्रातील ९ होड्या गॅस कटरने तोडून त्यांना जलसमाधी दिली.या कारवाईने वाळूतस्करांचे कंबरडे मोडले असून तालुक्यात झालेली ही पहिलीच कारवाई आहे. (वार्ताहर)

Web Title: Sand Mafia's 9 ships!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.