सोपारा स्तुप देतो शांतीचा संदेश अन् गातो महती बौद्ध स्तुपाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:04 AM2018-11-19T04:04:16+5:302018-11-19T04:04:24+5:30

सोपारा येथील बौद्धस्तुपालाअडीच हजार वर्षांपूवीर्चा इतिहास असल्याचे बोलले जाते. सम्राट अशोकाने भारतात उभारलेल्या बुद्धस्तुपांपैकी एक असलेला सुर्प्पारक बुद्ध स्तूप आहे.

 Sapara Stupa gives peace message and Gato Mahto Buddhist Stupaachi | सोपारा स्तुप देतो शांतीचा संदेश अन् गातो महती बौद्ध स्तुपाची

सोपारा स्तुप देतो शांतीचा संदेश अन् गातो महती बौद्ध स्तुपाची

Next

वसई : सोपारा येथील बौद्धस्तुपालाअडीच हजार वर्षांपूवीर्चा इतिहास असल्याचे बोलले जाते. सम्राट अशोकाने भारतात उभारलेल्या बुद्धस्तुपांपैकी एक असलेला सुर्प्पारक बुद्ध स्तूप आहे. हा स्तूप भगवान बौद्धाच्या भिक्षापात्राच्या अवशेषाची चिरंतन स्मृती रहावी, या हेतूने स्थापन करण्यात आला होता. सम्राट अशोकाने राजपूत्र मिलिंद आणि राजकन्या संघमित्रा यांना येथूनच बौध्द धर्म प्रचारासाठी सिलोन येथे पाठविले होते.
हा स्तुप सांची स्तुपासारखा होता. २६०० वर्षापूर्वी शुर्पारक नगरीतून पुर्णा नावाचा एक प्रसिध्द व्यापारी श्रावस्ती (उत्तर प्रदेश) येथे व्यापारासाठी गेला. तेथे भगवान गौतम बुध्दांची प्रवचन ऐकून तो प्रभावित झाला. त्याच्या मनात वैराग्य निर्माण झाले. तो भगवान गौतम बुद्धांकडे प्रवजीत (दिक्षीत) झाला. पुर्णा भिक्खु झाल्यावर काही वर्षे श्रावस्तीत जमतवन विहारात भगवान बुद्धांच्या सहवासात राहून त्याने धम्माचा परीपुर्ण अभ्यास केला. आणि धम्माचा प्रचारासाठी अनुज्ञा घेऊन तो अपरान्त प्रदेशात (महाराष्टÑ) आपल्या मुळ गावी सोपाऱ्याला आला.
इथे आल्यावर त्यांनी एक चंदनाचा विशाल बुद्ध विहार बांधला. त्या विहाराला आठ दरवाजे होते. बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना पाचारण केले. भगवान बुद्ध या चंदनाच्या विहाराच्या उद्घाटनासाठी सोपायाला आपल्या ५०० भिखु समवेत आले व सात दिवस इथे थांबले होते. भगवान बुद्धांची आठवण चिरंतर रहावी म्हणून पुर्णाने त्यांच्याकडे भिक्षा पात्र मागीतले. भगवंताच्या महापरिनिर्वाणा नंतर २०० वर्षानी सम्राट अशोकाने इथेच स्तुपाची निर्मीती केली. सविस्तर वृत्त/२

सोन्याच्या करंडीत भिक्षापात्राचे तुकडे
इ.स.पूर्व २५० ते १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात सोपारा हे केवळ धामिर्क केंद्र नव्हे तर भारताच्या प्रसिद्ध पश्चिम किनारा व पश्चिम पट्टयातील एक उत्कृष्ट शहर, व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पायथ्यापासून अलंकाराच्या शिखरापर्यंत स्तुपाची उंची साधारण ५५ फूट, दगडी तिजोरीचा १७ व्यास व २४ इंच, तिजोरीत तांब्याच्या करंडीत वर्तुळाकार ठेवलेल्या भगवान बुद्धाच्या ब्राँझ धातूच्या ८ मूर्ती त्यात सोन्याच्या करंडीत भिक्षापात्राचे १३ तुकडे असे अवशेष एशियाटिक सोसायटीने सुरिक्षत ठेवले आहेत.

बुरुड राजाचा किल्ला असेही संबोधन
संघमित्रा आपल्या ६ भिक्खुणी समवेत बोधी वृक्षाची पिंपळाची फांदी घेऊन समुद्र मार्गे श्रीलंकेला गेली. दरम्यान तिने या विहाराला भेट दिली होती. सम्राट अशोकाने १४ शिलालेख कोरले. त्यातला ८ वा शिलालेख पं. भगवानलाल यांनी १८८२ साली भातेला तलावाजवळ शोधला.
९ वा शिलालेख मुंबईचे ऐशियाटीक सोसायटीचे ग्रंथपाल श्री. एन .ए. मोरे यांनी भुईगाव येथे १९५६ शोधून काढला. त्याचबरोबर ठाण्याचे म्ययूलॉग कलेक्टरच्या मदतीने स्तुपाचे उत्खनन केले. तेव्हा हा स्तुप जमीनीमध्ये गाडला गेला होता. स्थानिक लोक याला बुरूड राजाचा किल्ला म्हणू लागले.

Web Title:  Sapara Stupa gives peace message and Gato Mahto Buddhist Stupaachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.