सरपंचांच्या निवडणुका अखेर होणार जुलैमध्ये!
By admin | Published: May 29, 2016 02:45 AM2016-05-29T02:45:59+5:302016-05-29T02:45:59+5:30
ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल मध्ये मोठ्या रंगात जोशात झाल्या मात्र यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी मोठा कालावधी लागल्याने तापलेले राजकारण काहीसे थंडावले आहे मात्र जुन्या
- हुसेन मेमन, जव्हार
ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल मध्ये मोठ्या रंगात जोशात झाल्या मात्र यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी मोठा कालावधी लागल्याने तापलेले राजकारण काहीसे थंडावले आहे मात्र जुन्या सदस्यांचा कालावधी संपणार असल्याने जुलैच्या मध्यात नव्या सरपंचांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे गुडघ्याला सरपंचपदाच बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना आता लवकरच सरपंचाच्या खुर्चीत बसायला मिळणार आहे.
१७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन निकाल लागले. यावेळी जवळपास निवडून आलेले सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत आपलीच असल्याचा दावा केला. मात्र काहीनी सरपंचपदाच्या निवडीच्या वेळी हिसका दाखवतो अशी तंबीही विरोधकांना दिली होती.
मात्र निवडणुकांचे निकाल लागून एक महिन्याचा कालावधी झाल्याने वातावरण थंड झाले आहेत. मात्र अद्याप शासनाकडून सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने सगळ्यांची निराशा झाली आहे . मात्र ग्रामविकास विभागातील सूत्रांकडुन मिळालेल्या माहीती नुसार जुलैच्या १७ ते २५ तारखेदरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका घोषित होणार असल्याचे समजते .
यामुळे आता पुन्हा काही दिवसांतच राजकारण तापणार असून सदस्य एका पक्षाचे न सरपंच भलत्याच पक्षाचा असे ही चित्र तालुक्यात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर सरपंच होण्यास उतावीळ झालेल्या सदस्यानी आतापासूनच पक्षातील तालुकास्तरीय नेते आणि सहकारी यांची मनधरणी करायला सुरवातही केल्याचे दिसून येते. (वार्ताहर)