शनिवारी बॅसिन कॅथॉलिकचा सुवर्ण सोहळा
By admin | Published: March 9, 2017 02:17 AM2017-03-09T02:17:53+5:302017-03-09T02:17:53+5:30
देशातील पहिल्या दहा नागरी सहकारी बँकांत गणल्या जाणाया बिसन कँथॉलिक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव सोहळा शनिवार, ११ मार्च २०१७ रोजी वसईतील सेंट गोन्सालो
पारोळ : देशातील पहिल्या दहा नागरी सहकारी बँकांत गणल्या जाणाया बिसन कँथॉलिक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव सोहळा शनिवार, ११ मार्च २०१७ रोजी वसईतील सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या मैदानावर साजरा होत आहे. आर्च बिशप डॉ.फेलिक्स मच्याडो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास रिझर्व बँकेच्या कार्यकारी संचालिका सुरेखा मरांडी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, वसईच्या महापौर प्रविणा ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शताब्दी वर्षात सभासद व ग्राहकांसाठी बँकेतर्फे विविध योजना राबविल्या जाणार असून, येणाया वर्षात ग्राहक मेळावे, उद्योजक मेळावे, शेक्षणिक शिबीरे, आरोग्य शिबीरे, सहकार प्रशिक्षण शिबीरे, वेग-वेगळ्या प्रबोधनात्मक विषयावरील व्याख्याने तसेच निवृत्त आय.एस.आय. अधिकायांमार्फत करिअर गाईडंस शिबीरे घेण्यात येणार असल्याचे फुर्ट्याडो यांनी यावेळी सांगीतले.राज्यातील सात जिल्ह्यात ५३ शाखांमधून ९० हजार सभासद आणि ५ लाख ग्राहकांना आंम्ही बँकिंग सुविधा देत असून, गेल्या वर्षापर्यंत बँकेने ६ हजार ७७३ कोटी रूपयांचा एकूण व्यवहार केल्याची ब्रिजादिना कुटीनो यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
बँकेच्या वास्तुसाठी जागा खरेदी करण्यात आली असून, येत्या तीन वर्षात बँकेचे नवे सुसज्ज मुख्यालय उभारण्यात येईल. बँकेचे स्थापना वर्ष १९१८ ते २०१७ या शतकी प्रवासाचा बँकेच्या इतिहासाचा ग्रंथ संपादित करणार, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दोन कार्डियाक अँम्बुलन्स व शवपेटी पुरविण्यात येणार असून जेष्ठ नागरीकांसाठी घरपोच बँकींग सेवा देण्याचा, तसेच बँकेच्या ७५ वर्षे वयाहून अधिक वय असलेल्या सभासदांकरीता जादा व्याज दराची आकर्षक ठेव योजना राबविण्याचा विचार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ठ केले. (वार्ताहर)
७ मार्च चा कार्यक्रम आता होणार ११ मार्चला
बसिन कँथॉलिक बँकेचा शताब्दी महोत्सव समारंभ ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता. तथापी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीमुळे मुख्यमंत्र्यांना येणे शक्य झाले नाही. म्हणून तो कार्यक्रम आता ११ मार्च रोजी निश्चित झाला आहे. या कार्यक्र माची माहिती देण्यासाठी बँकेने बंगली येथील लोकसेवा मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बँकेचे उपाध्यक्ष ख्रिस्तोफर रॉड्रीग्ज, प्रमुख महाव्यवस्थापिका ब्रिजादिना कुटीनो, महाव्यवस्थापक आग्नेलो पेन व अनेक आजी-माजी संचालक यावेळी उपस्थित होते.