सोसायट्यांच्या सावकारीतून शेतकऱ्यांना वाचवा - घोलप

By Admin | Published: June 12, 2016 12:40 AM2016-06-12T00:40:33+5:302016-06-12T00:40:33+5:30

या तालुक्यातील शेतकरी खूप गरीब आहे. त्याला आर्थिक सवलतींच्या आधाराची गरज आहे असे असतांनाही त्याच्यावर सोसयट्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्याची सक्ती केली जाते.

Save the farmers from the societies lending; | सोसायट्यांच्या सावकारीतून शेतकऱ्यांना वाचवा - घोलप

सोसायट्यांच्या सावकारीतून शेतकऱ्यांना वाचवा - घोलप

googlenewsNext

जव्हार : या तालुक्यातील शेतकरी खूप गरीब आहे. त्याला आर्थिक सवलतींच्या आधाराची गरज आहे असे असतांनाही त्याच्यावर सोसयट्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्याची सक्ती केली जाते. या सोसायट्या जिल्हा अथवा राज्य बँकेकडून ९ टक्क्याने कर्ज घेतात आणि शेतकऱ्यांना ते १४ टक्क्याने देतात. सोसायट्यांची ही पठाणी सावकारी असून त्यातून शेतकऱ्यांना मुक्त करा अशी व्यथा येथे शनिवारी झालेल्या लोकमत आपल्यादारी या उपक्रमात शिवसेना शहरप्रमुख चित्रांगण घोलप यांनी मांडली.
हा उपक्रम प्रगती कॉम्प्युटर्स, नेहरूचौक जव्हार येथे शनिवारी सकाळी संपन्न झाला. या यावेळी लोकमतच्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी आणि वितरण विभागाचे सहायक महाव्यवस्थापक हारून शेख तसेच सुन्नि मुस्लिम ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष सैय्यद खलील कोतवाल, नगरसेवक गणेश रजपूत, संजय वांगड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर, पत्रकार तुषार नगरकर, तुळशीराम चौधरी, श्याम राऊत, अल्ताफ मेमन, अभिनव व्होकेशनल, जव्हारचे संचालक आसीफ मुजावर, मोमीन कोतवाल आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन लोकमतच्या वसई कार्यालयाचे असिस्टंट मॅनेजर उत्तम लोखंडे, यांनी केले तर कार्यक्रमासाठी संदीप सावळे, वितरण प्रतिनिधी लोकमत, पत्रकार हुसेन मेमन, योगेश रजपूत, रवि खुरकुटे, अलताफ मेमन यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

असंख्य समस्यांचा पडला पाऊस

- रतन बुधर यांनी जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा हे तालुके ९९ % आदिवासी तालुके असुन आजही येथे कुपोषणाची समस्या कायम आहे, १९९२ सालीचा वावर वांगणीचा इतिहासामुळे जव्हारला उप जिल्हा रुग्णालय घोषीत करण्यात आले. मात्र आजही ते झालेले नाही. वावरला डॉक्टर नाही, नर्स नाही, तालुक्यात धरणे आहेत मात्र पिण्यासाठी पाणी नाही गरीब आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुशिक्षीत मुले बेरोजगार आहेत, अशा मुलांकरीता रोजगार उपलध करून देणे, येथे हाताला काम नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात स्थलांतर होत आहे. शिक्षणाचा व प्रवेशाचा मोठा प्रश्न येथे आहे, ही समस्या दुर करावी.

- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुलोचना पालवे यांनी काळशेती सारखी मोठी धरणे असूनही पाणी मिळत नाही, ते मिळावे निराधार महिलांना दरमहा दिले जाणारे अनुदान वेळेवर दिले जावे, बचत गटांना सवलतीच्या दराने कर्ज मिळावे आदी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.

रियाज मनियार - सन २०१४ च्या झालेल्या मिटींगमध्ये जव्हारचे ग्रामीण रूग्णालय वाडा येथे हलविण्याची खटपट सुरू आहे, परंतु त्याची खरी गरज जव्हार, मोखाडा, खोडाळा या अतिदुर्गम आदिवासी भागाला आहे, त्यामुळे जव्हारचे ग्रामीण रूग्णाल जव्हारच्या नगर परिषद हद्दीतच ठेवावे, तसेच अल्प संख्याकासाठी मोजकाच निधी दिला जातो, त्याची मर्यादा वाढवावी.
दिनेश भट- जव्हार हा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेला भाग आहे, पाणी, रोजगार, पर्यटन विकास, शेतकरी, उच्च शिक्षण गरज आहे, जि. प. शाळेत इ. ८ वी पर्यत वर्ग आहेत, त्यामुळे इ. ९ वी मध्ये प्रवेश मिळणे कठीण होते, परीणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे.
जव्हारच्या खडखड धरणाचे पाणी जव्हारमध्ये येणे गरजेचे आहे, तसेच अशा विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लोकमतने जे पाऊल उचलले आहे, ते खुपच योग्य असून सर्व पक्षांनी एकत्र येऊन येथील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Web Title: Save the farmers from the societies lending;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.