केळवेतील लहानग्यांचे ‘सेव्ह पपीज’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:57 PM2020-02-19T23:57:43+5:302020-02-19T23:57:48+5:30
कौतुकास्पद : कुत्र्याच्या नऊ पिलांना जीवदान
हितेन नाईक
पालघर : नुकतीच प्रसूती झालेल्या कुत्रीचा अचानक मृत्यू झाला. पण, याची काहीच जाणीव नसलेली आणि भुकेने तिच्या पान्ह्याला चिकटलेली पिल्ले बाजूलाच क्रिकेट खेळणाऱ्या बच्चे कंपनीला दिसली. आणि या मुलांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्यासाठी दूध तसेच अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या मुलांनी ‘सेव्ह पपीज’ नावाने पैसेही गोळा केले.
केळवे बाजारात दुपारी क्रिकेट खेळणाºया निहार वर्तक, नेहा आमेट, प्राप्ती पाटील, विशाल पाटील, कनिष्क पाटील, सिमरन आमेट, क्रिस्टल आमेट, गौरव कोल्हेकर, ध्रुवी आमेट, ओवी पाटील, पार्थ पाटील आणि सार्थक पाटील या आदर्श विद्या मंदिर केळवे, पालघरमधील टिष्ट्वंकल स्टार, आनंदाश्रम कॉन्व्हेंट हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना कुत्रीच्या पान्ह्याला चिकटलेली नऊ पिल्ले भुकेने ओरडताना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता ती कुत्री मृत झाल्याचे आढळले. त्यांनी तातडीने घरच्यांच्या मदतीने घरातील जुने कपडे, पुठ्ठे जमवून उबदार आडोसा केला. त्यांच्यासाठी आवश्यक वस्तू विकत आणण्यासाठी खाऊचे पैसे एकत्र केले. ते कमी पडल्याने त्यांनी ‘सेव्ह पपीज’चा डबा घेऊन भर उन्हात पैसे गोळा करण्यास सुरूवात केली आणि नागरिकांनीही त्यांना प्रतिसाद दिला.
प्राणिमित्रांना आवाहन
च्सध्या ही मुले आपल्या परीने त्या नऊ पिलांची काळजी घेत असून त्यांची अधिक काळजी घेण्यासाठी त्यांना प्राणीमित्र संघटनांच्या मदतीची आवश्यकता भासत आहे.