बचत गटांना मोबदला मिळेना, सहा महिन्यांपासूनची बिले थकली, तांत्रिक अडचणींचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:44 AM2017-09-10T05:44:43+5:302017-09-10T05:44:48+5:30

तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करीत महापालिकेने उद्यानांची देखभाल व राखण करणा-या अनेक महिला बचत गटांची सहा महिन्यांपासूनची बिले थकवली आहेत.

Savings groups get remuneration, bills for six months have been tired, technical problems are due | बचत गटांना मोबदला मिळेना, सहा महिन्यांपासूनची बिले थकली, तांत्रिक अडचणींचे कारण

बचत गटांना मोबदला मिळेना, सहा महिन्यांपासूनची बिले थकली, तांत्रिक अडचणींचे कारण

Next

- शशी करपे ।

वसई : तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करीत महापालिकेने उद्यानांची देखभाल व राखण करणाºया अनेक महिला बचत गटांची सहा महिन्यांपासूनची बिले थकवली आहेत. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून घरखर्च उचलणाºया असंख्य महिला अडचणीत आल्या आहेत.
वसई विरार महापालिका हद्दीतील १३८ उद्यानांची देखभाल व राखण करण्याची कामे नोंदणीकृत महिल बचत गटांना देण्यात आली आहेत. त्यासाठी ३ कोटी ६० लाख २४ हजार ९०० रुपये वार्षिक रक्कमेच्या खर्चास मंजूरी दिली आहे. तसेच वर्षभरात केलेल्या कामातील कुशलता, कार्यक्षमता, सुशोभिकरण आदी बाबींचे निरीक्षण करुन पुढे त्यांना मुदतवाढ आयुक्तांच्या निर्देशानुसार देण्यात येईल, असा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांकरता १० कोटी ८० लाख ७४ हजार ७०० इतक्या रकमेला मंजूरी देण्यात आली आहे.
महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून शहरातील गरीब, गरजू महिलांना रोजगार मिळावा या हेतून महापालिकेने १३८ उद्यांची देशभाल व राखण करण्याची कामे बचत गटांना दिली आहेत. त्यामुळे शहरातील असंख्य महिलांना आपल्या घराजवळच रोजगार मिळाला आहे. प्रत्येक उद्यानांची क्रमवारी करून त्यानुसार बचत गटांना मोबदला ठरवण्यात आला आहे.
मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून अनेक महिला बचत गटांची बिले थकवण्यात आलेली आहेत. त्यामुळे गेली सहा महिने काम करूनही असंख्य महिलांना कष्टाचे पैसे मिळालेले नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
प्रत्येक बचत गट उद्यान देखभालीचे फोटो, रजिस्टर, आवश्यक कागदपत्रे यांची वेळोवेळी पूर्तता करीत असतात. पण, लालफितीच्या कारभारात त्यांची बिले सहा महिन्यांपासून थकली आहेत. उद्यान विभागाकडून लेखा विभागाकडे बिले पाठवली आहेत असे सांगण्यात आले. तर लेखा विभागाने प्रत्येक प्रभाग समितीकडे प्रस्ताव पाठवले असल्याचे सांगत आहेत. बिलांची जबाबदारी ऐकमेकांवर ढकलली जात असल्यानेच महिला बचत गटाचे पैसे रखडल्याची तक्रार शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, बचत गटांना उद्यानांची कामे दिल्याने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची कमाई बंद झाली होती. त्यामुळे या लॉबीने ठेके दिल्यानंतरही पहिले काही महिने अनेक बचत गटांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याची सबब सांगत बिले थकवण्याची कामे केली होती. तर उद्यानांचा ठेका दिल्यानंतर उद्यानातील सुरक्षा रक्षकही काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे उद्यानात येणाºया समाजकटकांचा त्रास महिला बचत गटातील महिला आणि पर्यटकांना सहन करावा लागत होता.

महिलांचे सबलीकरण होणार क से?
महापालिकेचे अधिकारी अशा पध्दतीने वागत असतील तर महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सक्षमीकरण होईल का ?. महिलांना त्यांचा मेहनताना मिळाला नाही तर त्या उद्यानांची देखभाल प्रामाणिकपणे केली जाईल का ?. जर देखभाली अभावी उद्यानांची दुर्दशा झाली तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न चेंदवणकर यांनी उपस्थित केले आहेत.
याप्रकरणी जातीने लक्ष घालून बचत गटांचा मेहनताना त्वरीत देण्यात यावा. तसेच भविष्यात मेहनताना वेळच्या वेळी कसा मिळत राहिल याकडे लक्ष घालावे अशी मागणी चेंदवणकर यांनी केली आहे.

आता बिले थकवून बचत गटांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरु असून पैसेच मिळत नसल्याने नंतर बचत गट ठेका घ्यायला येणार नाही अशी व्यूहरचना महापालिकेतील काही अधिकारी ठेकेदारांच्या इशाºयावरून करीत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात केली जात आहे.

Web Title: Savings groups get remuneration, bills for six months have been tired, technical problems are due

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.