भंडारी पतपेढीमध्ये घोटाळा; सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, खातेदारांच्या रकमेचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:54 AM2018-04-15T05:54:16+5:302018-04-15T05:54:16+5:30

वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.

 Scam in Bhandari Credit Card; Filing of FIR against six employees, loss of account holders amount | भंडारी पतपेढीमध्ये घोटाळा; सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, खातेदारांच्या रकमेचा अपहार

भंडारी पतपेढीमध्ये घोटाळा; सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, खातेदारांच्या रकमेचा अपहार

Next

पारोळ : वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.
वसईतील पारनाका येथे पतपेढीचे मुख्यालय असून भंडारी समाजातर्फे युवक सहकारी पतपेढी चालविण्यात येते. वसईच्या नालासोपारा येथे एक शाखा आहे. मात्र या पतपेढीत खातेदाराच्या आणि सभासदांच्या रकमेचा अपहार होत असल्याची बाब समोर आली आहे. संचालाकांनी पतपेढीतील सहा कर्मचाºयांना यापूर्वीच बडतर्फ करून त्यांच्याविरोधात निबंधक आणि पोलिसांकडे तक्र ार दाखल केली होती. या तक्र ारीची पडताळणी केल्यानंतर पतपेढीत तब्बल ८ कोटी ५६ लाख रु पयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पतपेढीच्या सहा कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा येथील शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सुरज ठाकूर, लिपिक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी आदींचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१,४७७ (अ) ४२०, ३४ सह एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९ चे कलम १४६ (प), १४६ (प), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी याप्रकरणी तक्र ार दिली होती. युवक सहकारी पतपेढी ही भंडारी समाजाची पतपेढी असून समाजातील लोकांनी यात आपले पैसे गुंतवले होते. संस्थेचे दोन हजार भागधारक आहेत. संस्थेचे थकीत कर्ज आहे. त्यातून कोट्यावधी रु पयांची येणी बाकी आहे. त्यातून खातेदारांची रक्कम दिली जाईल असे आश्वासन संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष पंकज चोरघे यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करत असून सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे वसईचे उपअधीक्षक ताटेवाड यांनी सांगितले.

असा केला कर्मचाºयांनी घोटाळा
गेल्या काही वर्षापासून खातेदारांना त्यांनी भरेलल्या मुदत ठेवींचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे सभासदांनी पैशांच्या रकमेसाठी पतपेढीत तगादा लावला होता. संस्थेचे भागधारक एक भागधारक तसेच शिवसेना उपतालुकाप्रमूख अतुल पाटील यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.
अतुल पाटील यांनी संचालक मंडळ व कर्मचा-यांविरोधात ५ एप्रिल रोजी आर्थिक गुन्हे शाखा पालघर येथे तक्र ार दाखल केल्यानंतर आपली कातडी वाचिवण्यासाठी विद्यमान संचालक मंडळांनी कर्मचाºयांना बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप केला आहे.


परस्पर रकमा काढून व मुदतठेवी आणि बचतठेवीत फेरफार
वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्मचाºयांनी बचत ठेव, आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना तसेच निवृत्ती ठेव योजना, पतसंस्थेच तारण ठेवलेल्या सोने आदी बनावट दस्तावेज तयार करून हडप केले होते.
खातेदारांच्या खात्यातून परस्पर रकमा काढून व मुदत ठेवी आणि बचत ठेवीत फेरफार करून तारण कर्जामधील सोन परस्पर विल्वेवाट लावून ८ कोटी ५६ लाख १९ हजार एवढ्या रकमेचा अपहार केला आहे. अपहार करणारे सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापक यांनी संगनमत केले होते.
ज्या खातेदाराने १० लाखाची मुदत ठेव जमा केली असेल त्याला १० लाखाची पावती दिली जायची मात्र प्रत्यक्षात ५ लाख रु पयेच जमा केले जायचे. तसेच अनेकदात खातेदारांच्या बोगस सह्या वापरून पैसे काढले जायये. वर्षातून दोनदा सरकारी आणि खाजगी लेखापरिणक्ष व्हायचे तरी देखील हा घोटाळा लक्षात आला नाही हे विशेष.

Web Title:  Scam in Bhandari Credit Card; Filing of FIR against six employees, loss of account holders amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं