जमीन खरेदीत घोटाळा, मोखाड्यामध्ये शासनाच्या डोळ्यांत धूळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:57 AM2018-01-07T01:57:35+5:302018-01-07T01:57:44+5:30
भूमाफिया दलाल व महसुल विभागाच्या काही भ्रष्ट अधिका-यांच्या संगनमताने मोखाड्यात जमीन घोटाळा झाला आहे. याबाबतचे कागदपत्रे लोकमतच्या हाती आल्याने बोगस जमीन खरेदी विक्रीचे ह प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
- रवींद्र साळवे
मोखाडा : भूमाफिया दलाल व महसुल विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाºयांच्या संगनमताने मोखाड्यात जमीन घोटाळा झाला आहे. याबाबतचे कागदपत्रे लोकमतच्या हाती आल्याने बोगस जमीन खरेदी विक्रीचे ह प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
तालुक्यातील गोंदेबुद्रुक येथील मथीबाई धोंडीराम गांगुर्डे यांच्या मूळ मालकीची वडिलोपार्जित नवीन शर्त (महार वतन) जमीन सर्व्हे नं ३४९/१ च्या ५ हेक्टर १५ आर क्षेत्रा मधील १२ एकर ३५ गुंठे जमिनीची उताºयावरील शर्तीचा उलेख नष्ट करून ती खालसा करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन विक्री करण्यात आली आहे. परंतु ही जमीन महारवतन नवीन शर्तीची असताना तिची विक्र ी झालीच कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या जमिन खरेदी विक्री प्रकरणातील भू माफियांवर कारवाईची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर महसूल विभागाचे कर्मचारी आणि जमीन दलाल यांनी या जमिनीत बेकायदेशीर पणे रमेश पांडुरंग दिवेकर यांचे नाव समाविष्ट करून या जमिनीची विक्र ी केली असल्याचे मथीबाई गांगुर्डे यांचे म्हणणे आहे.
तसेच या प्रकरणाच्या खोलात गेले असता भूमिअभिलेख कार्यालयाच्या ९, (३) (४) च्या प्रतींमध्ये नाव जुनी शर्तीच्या ऐवजी खालसा असा बद्दल करून खाडाखोड करण्यात आली आहे. तसेच हा प्रकार निदर्शनास आल्या नंतर त्यावेळेस संबंधित कर्मचारी हे निलंबित सुद्धा झाला होते. तसेच या जमिनीची १९४०-५० या काळातील रेकॉर्ड वर भिका राघो गांगुर्डे यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या मथीबाई ह्या वारसदार आहेत असे असून महत्वाची बाब म्हणजे भूमाफिया व महसुल विभागाच्या भ्रष्ट अधिकाºयांनी मोठ्या हिक्मतीने ही जमीन खालसा असल्याचे दाखवून वर्ष २०१२ मध्ये नाशिक येथील बिल्डर अशोक वसंत कुठे यांनी या १२ एकर ३५ गुंठे जमिनीची खरेदी करून पुन्हा वर्ष २०१३ मध्ये ती दीपक अरु ण शेलार यांना विक्र ी केली आहे.
शर्तीच्या बाबतीत कोणतीही परवानगी न घेता बोगस पणे या जमिनीचा खरेदी विक्र ी व्यवहार करण्यात आहे. यामुळे अशा घोटाळे खोर भूमाफिया व महसूल विभागाचे तलाठी कर्मचारी यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वडिलोपार्जित विडलाची ही नवीन शर्तीची जमीन मला वारसाने मिळालेली आहे तसेच मी माङया विडलांना एकच वारसदार असतांना तसेच जुन्या रेकॉर्ड वर रमेश पांडुरंग दिवेकर व इतर यांचा कोणताच सबंध नसताना महसूल विभागाचे कर्मचारी व या जमीन दलालानी बेकायदेशीर नावे समाविष्ट करून विक्र ी केली आहे यामुळे याची चौकशी करून या सर्वांनवर कठोर कारवाई करण्यात यावी
- मथीबाई धोंडीराम गांगुर्डे
सदरच्या जमिनीच्या मूळ मालक
या नवीन शर्त (महार वतनाच्या) जमिनी महाराष्ट्र सरकारने उदरनिर्वाहसाठी कसण्यासाठी दिल्या होत्या. यामुळे या जमिनीची सहजा सहजी विक्री करता येत नाही. शासनाच्या अनेक नियमनाची चौकट आड येतात. यामुळे हे भूमाफिया दलाल महसूल विभागाच्या भ्रष्ट अधिकाºयांना हाताशी धरून असे प्रकार करीत असतात.
पूर्वी तलाठी कार्यालयाकडून आकारबंद करताना अनावधानाने नवीन शर्तीची नोंद झाली नव्हती. त्यानंतर या जमिनीची दोन वेळा विक्री झाली. मात्र, तलाठी कार्यालयाला ही चुक लक्षात आल्यानंतर सदर जागेवर नवीन शर्त अशी नोंद करुन कमी पडत असलेले स्टॅम्प ड्यूटीचे प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
- पी. जी. कोरडे,
तहसीलदार (मोखाडा)