‘आमची वसई’ची दुर्गभ्रमंती व अभ्यास मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:56 PM2019-12-29T22:56:16+5:302019-12-29T22:57:03+5:30

दुर्गप्रेमींसाठी विनामूल्य कार्यक्रम; ऐतिहासिक दाखल्यांसह तज्ज्ञांकडून सहभागींना माहिती

The scandalous and practice campaign of 'Our Vasai' | ‘आमची वसई’ची दुर्गभ्रमंती व अभ्यास मोहीम

‘आमची वसई’ची दुर्गभ्रमंती व अभ्यास मोहीम

Next

वसई : मागील अनेक गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीनंतर लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा आमची वसईतर्फे (गडकिल्ले) दुर्ग भ्रमंती व अभ्यास मोहीम सुरू करण्यात आली आहे.

आमची वसई या सामाजिक समूहाने रविवार दि. २९ डिसेंबरपासून वसई दुर्ग भ्रमंती व अभ्यास मोहीम हा विनामूल्य कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित केला होता. या उपक्रमाला जनतेने भरपूर प्रतिसाद दिल्याची माहिती ऋषिकेश वैद्य यांनी ‘लोकमत’ला दिली.

या मोहिमेत वसईच्या इतिहासाची व तेथील वास्तूची प्रत्यक्ष स्थळी जाऊन सविस्तर माहिती तज्ञ मंडळींनी उपस्थितांना दिली. या प्रसंगी सर्व वयोगटातील शेकडो दुर्गप्रेमी, इतिहास-वास्तू अभ्यासक व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. या भ्रमंतीत वसई-विरारमधूनच नव्हे तर वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, तारापूर, डहाणू, मुंबई, पनवेल, डोंबिवली इत्यादी ठिकाणाहून किल्लेप्रेमी लोक सहभागी झाले होते. यामध्ये ७५ वर्षांच्या आजी-आजोबांपासून ते ४ वर्षांच्या चिमुकल्यापर्यंत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सुरुवातीला सकाळीच सर्वांनी किल्ल्यातील स्मारकात चिमाजी आप्पांना मानवंदना अर्पण केली. तेव्हा जय वज्राई- जय चिमाजीच्या जयघोषाने अवघा वसई दुर्ग दुमदुमला. तर ऐतिहासिक श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात भगवान परशुरामांद्वारे निर्मित वसईच्या निर्मितीपासून शिलाहार, गौतमीपुत्र, बिंबदेव, नाथाराव भंडारी, पोर्तुगीज, मराठा राज्यकर्त्यांचा इतिहास उपस्थितांना सांगितला गेला. तसेच मराठ्यांच्या रणनीती-राजनीतीचेही ऐतिहासिक दाखले या वेळी देण्यात आले.

काय आहे मोहीम...
जलपानानंतर दुर्ग भ्रमंती सुरू झाली. त्यात नागेश महातीर्थ, बालेकिल्ला, किल्ल्यातील साखर कारखाना, शिबंदी, मिझरी कॉर्दिया, नगरपालिका, सिनेट हाऊस, बाजारपेठ, आश्रम, विविध देवळे, महाविद्यालय, वखार, मठ, विविध आकाराच्या विहिरी, १० बुरुज, चक्री जिना, सागरी व भुई दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, पाण्याची विविध कुंडे, स्नानगृह इत्यादी वास्तूंची भेट व त्यांची सविस्तर माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी उपस्थित किलेप्रेमींनी लवकरच पुढील मोहिमा आखण्याचाही आग्रह धरला.

Web Title: The scandalous and practice campaign of 'Our Vasai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.