केडीएमसीत अधिकाऱ्यांची वानवा, रिक्त पदांसाठी पत्रव्यवहार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:09 AM2019-11-29T01:09:41+5:302019-11-29T01:09:59+5:30

केडीएमसीतील मोजकी महत्त्वाची पदे वगळता बहुतांश पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

Scarcity of officers at KDMC | केडीएमसीत अधिकाऱ्यांची वानवा, रिक्त पदांसाठी पत्रव्यवहार सुरूच

केडीएमसीत अधिकाऱ्यांची वानवा, रिक्त पदांसाठी पत्रव्यवहार सुरूच

googlenewsNext

कल्याण - केडीएमसीतील मोजकी महत्त्वाची पदे वगळता बहुतांश पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका अधिका-यांना तीन ते चार विभागांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे पाहता प्रतिनियुक्तीवरील अधिकारी मिळावेत, यासाठी प्रशासनाने नगरविकास खात्याकडे १२ पत्रे पाठविली असताना यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारमार्फत तरी ठोस कृती होईल का, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. परंतु, १९९५ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात आली. कालांतराने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या वाढली असून आज साडेबारा लाखांहून अधिक लोकसंख्या पोहोचली आहे. त्यात १ जून २०१५ ला २७ गावे महापालिकेत आली. त्यामुळे महापालिकेवर अधिक सोयीसुविधांचा ताण पडला आहे.

दुसरीकडे दरमहिन्याला येथील अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत, परंतु नव्याने भरती झालेली नाही. यात अधिकाºयांची प्रकर्षाने वानवा जाणवत असल्याने बहुतांश महत्त्वाच्या पदांवर प्रभारी नेमणुका करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग अधिकारी या महत्त्वाच्या पदावर सहायक आयुक्त नेमणे बंधनकारक असताना हे पद लिपिक यासह अन्य दुय्यम पदावर असलेल्या व्यक्तीकडे बहाल केले जात आहे. लाचलुचपत प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेल्या प्रभाग अधिका-यांची संख्या अधिक आहे.

केडीएमसीत दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर झाली आहेत. यातील एक पदच भरण्यात आले होते. या पदावरील अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित झाल्यापासून ही दोन्ही पदे आजतागायत रिक्त आहेत. या पदांसह जलअभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि मुख्य लेखापरीक्षक, अशी महत्त्वाची पदेही कायमस्वरूपी भरण्यात आलेली नसल्याने त्या पदांचा गाडा ही प्रभारी म्हणून नेमणूक केलेलेच हाकत आहेत.

प्रशासनातील ही पदे आहेत रिक्त

केडीएमसीतील अधिका-यांच्या कमतरतेबाबत आतापर्यंत १२ वेळा नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यात दोन अतिरिक्त आयुक्त, चार उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, पाच प्रभागक्षेत्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, जलअभियंता आणि मुख्य लेखा अधिकारी प्रत्येकी एक, नगररचनाकार आणि सहायक नगररचनाकार प्रत्येकी दोन आणि एक प्रशासन अधिकारी महापालिकेला हवा आहे.

सध्या आयुक्त, उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, शहरअभियंता आणि मुख्य लेखापरीक्षक आदी पदे कायमस्वरूपी भरण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्य लेखाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार मुख्य लेखापरीक्षकांना प्रभारी म्हणून सांभाळावा लागत आहे.
 

Web Title: Scarcity of officers at KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.