टाकाऊ पासून किल्ले संवर्धनाचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:39 AM2017-09-01T00:39:09+5:302017-09-01T00:39:17+5:30
विक्रमगड शहराजवळील ओंदे गावांतील विक्रांत युवा मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा या इतिहासकालीन लोप पावत चाललेले किल्ल्यांच्या सवर्धनाच्या दृष्टिकोनातून संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे.
राहुल वाडेकर
विक्रमगड : विक्रमगड शहराजवळील ओंदे गावांतील विक्रांत युवा मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा या इतिहासकालीन लोप पावत चाललेले किल्ल्यांच्या सवर्धनाच्या दृष्टिकोनातून संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यात गंभिरगड व अशेरीगड तयार केले असून त्या साठी टाकाऊ वस्तू ( फेकून दिलेल्या वस्तू) माती, गोंनपाट, बांबुच्या काठ्या, भंगारातील तार, हिरवळीसाठी मोहरी आदि. वस्तुचा वापर करून मनाला स्पर्श करणारा मनमोहक इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.
यंदा मंडळाचे ९९ वे वर्ष असून त्या निमित्ताने निवडलेला विषय तडीस नेण्यासाठी मंडळाकडून गंभीरगड, आशेरीगड व भुपतगड या किल्ल्यांना वर्षभरामध्ये अनेकदा भेटी देण्यात आल्या. अर्थात या भेटी केवळ पर्यटन नसून या निमित्ताने पर्यटकांचे प्रबोधन होईल, त्यांच्याकडून किल्लयाच्या परिसराला कोणतीही हानी पोहचणार नाही याकरीता फलक लावण्यात आले आहेत. पुढील वर्षी या गणेश उत्सवाला १०० वर्ष पूर्ण होणार असल्याने सामाजिक दृष्टी कोनातून वेगळा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे लोकमतला सांगण्यात आले.
या मंडळाच्या आलेखातील सामिजिक व जनजागृतीच्या दृष्टीने २००४ हे वर्ष महत्याचे असून त्यावेळी साकारलेला एड्स जनजागृती देखावा ठाणे जिल्ह्यात प्रथम पारोतोषिकाचा मानकरी ठरला होता. तर २००६ मध्ये व्यसन मुक्ती आकर्षक देखाव्यासाठी विक्र मगड पोलिस स्टेशन तालुक्यात प्रथम पारितोषिक या मंडळाला मिळाले आहे. गेल्या वर्षी या मंडळाने लोकमान्य टिळक आकर्षक देखावा स्पर्धा ( महाराष्ट्र शासन) स्पर्धेत भाग घेतला होता. या वेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा मनाला स्पर्श करणारा देखावा तयार केला होता.
रात्री सादर होणाºया सांस्कृती कार्यक्रमात किल्ले संवर्धन व इतिहासावर आधारीत छोट्या नाटिका मंडळाचे सदस्य सादर करुन किल्ले संवर्धनाचा संदेश देत आहेत. यातून त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो.
या वर्षी किल्ले संवर्धन देखाव्या शेजारी किल्ले संवर्धनाचा संदेश देणारी पोस्टर्स लावली आहेत. त्याच प्रमाणे देखाव्या शेजारी विविध किल्ल्याचा इतिहास याचे पोस्टर देखील मंडळाने सादर केले आहेत. शिवाय मंडळाकडून भारतीय इतिहासावर नाटीका सादर केल्या जात असून प्रबोधन केले जाते.