सरकारी कर्मचारी संपामुळे डहाणूतील शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:54 PM2018-08-07T14:54:07+5:302018-08-07T14:55:44+5:30
राज्यव्यापी 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/ बोर्डी - राज्यव्यापी 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी (7 ऑगस्ट) विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे. पारनाका येथील बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटना भाजपाप्रणीत असल्याने त्यांचा संपात सहभाग नसल्याची माहिती पालघर ठाणे माध्यमिक शिक्षक संघ, सहकारी पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी दिली.
राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर राज्यव्यापी संपात पालघर जिल्ह्यातील पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघ, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, अनुदानित आश्रमशाळा शिक्षक संघटना, जिल्हा कला अध्यापक मंडळ, क्रीडा संघ आदी संघटनांना एकत्रित करून जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापीत करून संपात सहभागी झाली आहे. त्याच्या अध्यक्षपदी पुरषोत्तम ठकसेन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.