चौक जिल्हा परिषद शाळा डिजिटल
By admin | Published: March 15, 2017 01:56 AM2017-03-15T01:56:40+5:302017-03-15T01:56:40+5:30
महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत असतांना जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील चौक जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले
जव्हार : महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत असतांना जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील चौक जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. या वर्गामध्ये आकर्षक चित्रांचे रेखाटन करण्यात आले असून सुसज्ज असे संगणक व टॅब, अभ्यासक्रमासहीत प्रोजेक्टर, प्रिंटर, अशा साधनसमुग्रीची आकर्षक रचना असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढीस लागण्यास मदत होईल, असे येथील शिक्षकांनी सांगितले.
२१ व्या तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी मुलांना गगनभरारी घेण्यास यामुळे उत्तेजन मिळेल. असे चौक ग्रामपंचायतीचे सरपंच शिला मोतीराम काटेला यांनी सांगितले. की आजपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी आमच्या मुलांचा संबंध येत नव्हता. यांमुळे जगभरातील ज्ञानाच्या कक्षेत आमची मुले येतील. जगाशी स्पर्धा करतांना आमचे विद्यार्थी कुठेही मागे राहायला नको. या उदात्त भावनेने आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीने सहकार्य केले.
यापुढे जव्हार तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक होईल. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून शाळेतील शिक्षकही मेहनती आहेत. जव्हार तालुक्यातील शाळेतील शिक्षकांनी भेट देऊन या शाळेचा कित्ता गिरवावा,असे आवाहन केले. पंचायत समिती, उपसभापती सीताराम पागी, पंचायत समिती सदस्य मनू गावंढा, गटविकास अधिकारी सुनील पठारे, स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र सहारे , विस्तार अधिकारी अरु ण कनोजा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन तुंबडा यांनी केले. (वार्ताहर) (छायाचित्र पान ३)