वानगावच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षाकवच
By admin | Published: April 29, 2017 01:19 AM2017-04-29T01:19:34+5:302017-04-29T01:19:34+5:30
डहाणूच्या वानगाव ठाण्याच्या हद्दीतील किनारपट्टीवरील सागरी सुरेक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सुरु झालेले सागरी सुरक्षा कवच
डहाणू : डहाणूच्या वानगाव ठाण्याच्या हद्दीतील किनारपट्टीवरील सागरी सुरेक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सुरु झालेले सागरी सुरक्षा कवच अभियान शुक्रवारी संध्याकाळी पूर्ण झाले. या अंतर्गत चिंचणी, सरकारी, आंबा येथील सागरी चौकात असलेल्या पोलिसांनी २०० वाहनांची तपासणी केली. शिवाय चिंचणीपासून डहाणूपर्यतच्यागावातील बोटी उतरण्याच्या ठिकाणांवर नाकाबंदी करुन बोटी तपासण्यात आल्या.
दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने होण्याची शक्यता गृहीत धरुन सागरी किनारपट्टीवर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांच्या आदेशाने सागरी सुरक्षाकवच अभियान घेण्यात आले होते. वानगावचे पोलीस निरीखक अरुण फोंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले हे सागरी कवच गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस घेण्यात आले. या अभियानात किनारपट्टीवरील चिंचणी, दांडेपाडा, गुंगवाडा डहाणू येथील सागरी तटरक्षक दलाची ही तपासणी घेण्यात आली. याशिवाय चिंचणीपासून डहाणू परिसराच्या किनारपट्टी वर गस्त घालताना संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात आली. तसेच टेहळणी मनोऱ्यावरुन आढावा घेण्यात आला. त्याबरोबरच वानगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्स, लॉजेस तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. (वार्ताहर)