समुद्रकिनारी अवैध रेतीउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:23 AM2017-08-11T05:23:52+5:302017-08-11T05:23:52+5:30
सागरी किनाऱ्यावर गुन्हे घडू नयेत यासाठी माफियांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यात देऊनही या तालुक्यातील समुद्रकिनारी होणारी खुलेआम अवैध रेतीचोरी रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
बोर्डी : सागरी किनाºयावर गुन्हे घडू नयेत यासाठी माफियांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यात देऊनही या तालुक्यातील समुद्रकिनारी होणारी खुलेआम अवैध रेतीचोरी रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशाला जुमानले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. येथील सागरी पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून विशेष पसंती दिली जात आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याचे निर्देश मुंबईत झालेल्या बैठकीत केसरकर यांनी दिले होते. शिवाय सागरी पोलिसांना १२ मैलापर्यंत कारवाई करण्याचे अधिकार असून त्यानुसार बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या वेळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे उपस्थित होते.
वर्षभर डहाणू, बोर्डी पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा राबता असतो. मात्र डहाणू या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने रेती उपसा केला जात आहे. पारनाका, आगर आणि नरपड या गावचे सागरी क्षेत्र डहाणू, चिखले, घोलवड, बोर्डी, झाई हा किनारा घोलवड पोलिसांच्या अखत्यारीत आहे. या ठिकाणी थेट समुद्रात चारचाकी वाहने उतरवून रेती भरून वाहतूक केली जाते. तर बº्याच ठिकाणी पोत्यातून भरलेली रेती मजुरांकडून वाहिली जाते. प्रतिदिन केवळ चार तास काम करून पाचशे ते सहाशे रु पये मिळत असल्याने मजुरही उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये विद्यार्थी व महिला मजुरांचा खुबीने वापर केला जात आहे. हे थांबविण्याची मागणी होते आहे.
असाही विरोधाभास
किनाºयावर मोठे खड्डे पडून विद्रुरूपीकरणासह पर्यटकांना शारीरिक ईजा होण्याची शक्यता आहे. शिवाय रेती माफीयांच्या दहशतीचा सामना स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांना करावा लागत आहे. एकीकडे सागरी सुरक्षेचे धिंडवडे निघत आहेत. तर सागर सुरक्षा कवच आणि रस्ता सुरक्षा अभियान उत्तम पद्धतीने राबविल्याबद्दल कौतुक होते. हा विरोधाभास थांबला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.