तलासरीत अवैध दारूविक्रीू जोरात
By admin | Published: April 10, 2017 05:18 AM2017-04-10T05:18:47+5:302017-04-10T05:18:47+5:30
महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आल्याने तलासरी भागात दमण बनावटीची अवैध दारू
सुरेश काटे/ तलासरी
महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आल्याने तलासरी भागात दमण बनावटीची अवैध दारू विक्र ी फोफावली आहे.
तलासरी हा गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेलगतचा तालुका त्यामुळे तलासरीत दमण बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आवक होऊन त्याची गाव पाड्यात विक्र ी होते तसेच केंद्रशासित दादरा नगर हवेलीतूनही अवैध दारूही महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणून त्याची विक्र ी सर्रास होते पण या कडे दारूबंदी खात्याचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष आहे.
महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेशाने महामार्गावरील दारूची दुकाने व बार बंद पडले. त्यामुळे दारूची विक्री घटण्याऐवजी अवैध दारू विक्रीला उधा
ण आले. याचा फायदा घेत अनेकांनी तलासरी भागात मोठया प्रमाणात अवैध दारू आणून त्याची विक्री सुरू केली. त्यामुळे महामार्गालगतची दारू विक्री बंद झाली असली तरी गाव पाड्यात दमण बनावटीची दारू मात्र मुबलक मिळत आहे. अशीच बंदी कायम राहिल्यास या भागा तील ताडी व्यवसायाला सुगीचे दिवस येतील व अनेकांचा बुडालेला रोजगार मिळून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादनाचे साधन प्राप्त होईल.
ताडीला सुगीचे दिवस
पूर्वी पट्यावर ताडी पिण्यासाठी गर्दी करणारा आदिवासी बियर पिण्याकडे वळला होता, शासनाचे नियम व ताडी कडे पाठ फिरवलेला ग्राहक यामुळे या भागातील ताडी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता परंतु सध्या दारूच्या दुकानावरील बंदी मुळे दारू व बियर खुलेआम मिळत नसल्याने पुन्हा ताडीच्या पट्यावर तळीरामांची गर्दी दिसू लागली आहे,