दहा महिन्यांच्या बालकाचा ७२ तासांत शोध, पालघर पोलिसांची तत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:19 AM2017-12-23T02:19:51+5:302017-12-23T02:19:59+5:30
वाणगाव रेल्वे स्टेशन वरील एका कामगार महिलेच्या दहा महिन्याच्या बालकास पळवून नेणाºया पती-पत्नीस पोलिसांनी वापी येथून अटक केली. तक्रार दाखल होताच अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींना अटक करुन पोलिसांनी बालकाला सुखरुप पणे आईच्या स्वाधीन केले. ह्या प्रकरणात एखाद्या टोळीचा हाथ आहे का ह्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी दिली.
पालघर : वाणगाव रेल्वे स्टेशन वरील एका कामगार महिलेच्या दहा महिन्याच्या बालकास पळवून नेणाºया पती-पत्नीस पोलिसांनी वापी येथून अटक केली. तक्रार दाखल होताच अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींना अटक करुन पोलिसांनी बालकाला सुखरुप पणे आईच्या स्वाधीन केले. ह्या प्रकरणात एखाद्या टोळीचा हाथ आहे का ह्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी दिली.
वाणगाव स्टेशनच्या ट्रॅकच्या दुरु स्तीचे काम करणाºया बिहार येथील सुलो उपेंद्र माझी ही महिला आपल्या पिंकू ह्या मुलाला जवळच उभारलेल्या राहुटीत सोडून पतीसह बाजूला काम करण्यास निघून गेले. काही वेळाने ती परत आल्यानंतर मुलगा नसल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांची मदत घेतली.
पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे व अपर अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी या कामी तीन ते चार पथके तैनात करून मुंबई, ठाणे, गुजरात च्या दिशेने तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे ह्यांना आपल्या तपासा दरम्यान एक महिला कामाची मागणी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. तसेच ती आपली पिशवी विसरून गेल्याचे कळले.
त्या पिशवीत एका छाट्या कागदावर गुजराती भाषेत एक मोबाईल नंबर आढळून आला आणि तपासाची चक्रे गुजरातच्या दिशेने वळली. त्या आधारे पोलिसांनी वापी गाठले आणि आरोपी पूजा संतोष पटेल (२६), तिचा पती संतोष कंठाली पटेल (३०) ह्यांच्या सोबत पळवून आणलेल्या पिंकू ला ताब्यात घेतले. ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.