माध्यमिक शिक्षकांचे पालघरमध्ये धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:19 PM2019-08-09T23:19:58+5:302019-08-09T23:20:09+5:30
वेतनात दुरूस्तीचा प्रस्ताव; खाजगी अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते संकटात
पालघर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळातील, मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तरतुदी संबंधी दुरु स्ती करण्याचे प्रस्तावित केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी पालघर येथे शिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन केले.
माध्यमिक शाळातील कर्मचाºयांचे सुरक्षा कवच असलेल्या १९८१ च्या नियमावलीत शासनाने बदल करण्याचा घाट घातला आहे. या नियमावलीतील नियम ७(१)(२) मध्ये दुरुस्ती केल्याने फक्त माध्यमिक कर्मचाºयांना या पुढे वेतन व महागाई भत्त्यासाठी शासनाच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागणार आहे. इतर राज्य कर्मचाºयांना केंद्राप्रमाणेच वेतन भत्ते मिळणार आहेत. दुरुस्तीस प्रखर विरोध करण्यासाठी शिक्षकांना आता रस्त्यावर उतरावे लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष पी.टी.पाटील यांनी यावेळी सांगितले. संघटनेचे कार्यवाह गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, कार्यवाह के.डी.पाटील, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष प्रकाश वर्तक, कार्यवाह वाल्मिक प्रधान, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सुचिता पाटील, प्रणाली ठाकूर, रवींद्र ठाकूर आदी शिक्षक नेते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
जिल्हा माध्यमिक संघाचे प्रयत्न
शासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा व संभाव्य घटना दुरु स्ती विधेयकास विरोध करण्यासाठी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक संघाने कंबर कसली आहे. या प्रस्तावित तरतुदींना विरोध करण्यासाठीच शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर भर पावसात हे आंदोलन सुरू होते. या दुरूस्तीस प्रखर विरोध करण्यासाठी शिक्षकांना आता रस्त्यावरही उतरावे लागेल, असे संघटना अध्यक्ष पाटील म्हणाले.