पदवीधर मतदारांची गोपनीय माहिती फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:25 AM2018-04-05T05:25:00+5:302018-04-05T05:25:00+5:30
पदवीधर मतदारांनी अर्ज करताना दिलेली वैयक्तिक माहिती राजकीय पक्षाच्या हाती लागल्याची गंभीर बाब स्वाभिमानी वसईकर संघटनेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
वसई - पदवीधर मतदारांनी अर्ज करताना दिलेली वैयक्तिक माहिती राजकीय पक्षाच्या हाती लागल्याची गंभीर बाब स्वाभिमानी वसईकर संघटनेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आॅक्टोबरपासूनच मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसई तालुक्यातून सुमारे साडेनऊ हजार पदवीधरांनी मतदार नोंदणी अर्ज वसई तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत सादर केले आहेत. यात मतदाराने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी असलेली माहिती एका राजकीय पक्षाच्या हाती लागली आहे. त्यानुसार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी कॉल्स व मेसेज येत असल्याची तक्रार संघटनेचे प्रवक्ते रॉजर रॉड्रिक्स यांनी केली आहे. राजकीय पक्षाकडे जुनी यादी असेल, त्यावरून फोन कॉल करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवित, निवडणूक शाखेकडून माहिती फुटल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.