एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 12:58 AM2019-05-05T00:58:47+5:302019-05-05T00:59:15+5:30

नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली.

 Security of 2642 people on the shoulder of a one policeman | एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

Next

- मंगेश कराळे
नालासोपारा  -  नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. मात्र, नालासोपाºयाच्या तुळींज पोलीस ठाण्यात ४ महिन्यात तब्बल ५८० दखलपात्र गुन्हे नोंदविले गेले असून अदखलपात्र स्वरु पाच्या गुन्ह्यांच्या संख्येने ३४२२ चा आकडा गाठला आहे. या ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलिस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १४ सहायक उपनिरीक्षक, १२१ पोलीस कर्मचारी असा एकूण १५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटपुंजा समावेश आहे. तर ३ बिट मार्शल पोलीसांच्या ताफ्यात आहेत.

अधिकृत ३ लाख ५६ हजार ७०५ असून प्रत्यक्षात ७ ते ८ लाख लोकसंख्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. किमान २०० ते २५० पोलीस कर्मचारी आणि ३० ते ३५ अधिकारी येवढे मनुष्यबळ तुळींज पोलीस ठाण्यात आवश्यक आहे.
- डॅनियल बेन
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे

मुंबईमध्ये एक हजार लोकांसाठी १ पोलीस
मुंबईमध्ये एक हजार लोकसंख्येसाठी एक पोलीस कर्मचारी अशी रचना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तुलनेत तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील 3 लाख ५६ हजार ७०५ लोकसंख्येला (२०११ च्या जनगणनेनुसार) एका पोलिसांवर २६४२ लोकांच्या सुरक्षेचा भार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title:  Security of 2642 people on the shoulder of a one policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.