स्व. खासदार वनगांच्या लेटरहेडचा गैरवापर, विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:20 AM2018-02-15T03:20:46+5:302018-02-15T03:21:02+5:30
पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
पालघर : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
ज्या व्यक्तींनी आपले पूर्ण आयुष्य वंचित घटकांना, न्याय मिळवून देण्यासाठी करताना आपल्या पदाचा, पक्षाचा वापर कधीही वैयक्तिक फायद्यासाठी केला नाही अशा नि:स्पृह, निष्कलंक व्यक्तींच्या पश्चात त्यांच्या लेटरहेडचा दुरुपयोग ठेके मिळविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की माझी खात्रीपूर्वक माहिती अशी आहे की, नुकतेच स्वर्गवासी झालेल्या वनगा यांच्या स्वाक्षºया काही राजकीय व्यक्तींनी आणि ठेकेदारांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कोºया लेटरहेडवर सह्या घेऊन ठेवल्या होत्या. वनगाच्या चांगल्या, कुणावरही पटकन विश्वास ठेवण्याच्या स्वभावामुळे ते असे करीत असत.
त्यांच्या हयातीतही त्याचा वापर आपल्या व्यक्तिगत स्वार्थाकरता या पूर्वीही केला जात असे. आता त्यांच्या मृत्यूनंतरही त्याच लेटरहेडवर जुन्या तारखा टाकून काही ठेकेदारांनी बांधकामाची कामे देणारी शिफारस पत्रे तयार केली आहेत. आणि ती राज्यशासनाने कडे तसेच ठाणे, पालघरमधील बांधकाम खात्याच्या अभियंत्याकडे तसेच जिल्हाधिकाºयाच्या कार्यालयात दिली असल्याचे विवेक पंडित यांचे म्हणणे आहे.
वनगांच्या मृत्यू नंतर आधीच्या तारखाची आलेली पत्रे स्वीकारू नयेत आणि त्यावर कोणतीही कार्यवाही होऊ नये. या बाबतच्या सूचना आपण संबंधित सर्व अधिकाºयांना द्याव्यात अशी मागणी पंडित ह्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
फोर्जरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
अशा कामांचे प्रस्ताव ज्यांच्या कडून आले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर फोर्जरीचा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव, पालघर व ठाणे जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, यांनीही पाठविल्या आहेत.