‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:42 PM2019-11-02T23:42:50+5:302019-11-02T23:43:49+5:30

संडे अँकर । दक्षता जनजागृती सप्ताह ; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, जिल्हा परिषदेत झाला कार्यक्रम

'Serve the people without sacrificing bribe by thane' | ‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख कामांचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ करून सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शनपर धडे अ‍ॅण्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांना शुक्रवारी दिले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून, कामामध्ये पारदर्शकता ठेवून, अधिकारी-कर्मचाºयांनी नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद गतीने व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व त्याचे महत्त्व डॉ. पाटील यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनात आणून दिले. ‘इमानदारी एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ हाती घेण्यात आला आहे. यास अनुसरून नियोजन भवन येथे अधिकारी व कर्मचाºयांसाठी शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यशाळा घेऊन सखोल मार्गदर्शन पाटील यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे म्हणाले की, शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणुकीविना, तत्परतेने आणि पारदर्शीपणे कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत, याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी’ असे हातोटे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, संगीता भागवत, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता इंदुरकर आदी उपस्थित होते.

जनजागृतीसाठी कार्यक्रम
यावेळी शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांनी समयोचित भाषण केले. तर, ‘भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात तयार केलेल्या विविध लघुचित्रफिती, प्रसिद्ध मान्यवरांचे दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रि या पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ यांनी उपस्थितांना ऐकवल्या. या ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्ताने लाचलुचपत विभागाद्वारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालयांत बॅनर, पोस्टरद्वारे जागर
राज्यभरात २८ आॅक्टोबरपासून दक्षता सप्ताह सुरू झाला आहे. या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लाच घेऊ नये, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन तसेच शपथ दिली जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांसारखे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती केली जात आहे.

Web Title: 'Serve the people without sacrificing bribe by thane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.