ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील सेटलमेंट आता होणार बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:59 AM2019-01-21T00:59:53+5:302019-01-21T01:00:00+5:30
कामाचे कसलेही मोजमाप न करता काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असा शेरा देवून आजवर अनेक कामांची आगाऊ बिले काढली जात होती
जव्हार : कामाचे कसलेही मोजमाप न करता काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असा शेरा देवून आजवर अनेक कामांची आगाऊ बिले काढली जात होती यामुळे या ठेकेदार आणि अधिका-यांमधील सेंटलमेंटमुळे मोठा भ्रष्टाचार होत होता याची अनेक उदाहरण जव्हार मोखाड्यात पहावयासही मिळतील मात्र आता बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याला चाप बसवला असून तसा आदेशही काढण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांची कामे चालू करायाची काम २५ टक्के करायचे आणि काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असे सांगून रक्कम मात्र ५० टक्क्याहून अधिक द्यायची किंवा काम पूर्ण व्हायच्या आतच पूर्ण रक्कम देऊन टाकायची यामध्ये ठेकेदाराकडून आपले उखळ पांढरे करून घ्यायचे असा प्रकार सर्रास बांधकाम विभागात होतांना दिसत होता मात्र यामुळे अनेक कामे रखडतांनाही दिसून येत होती
मात्र आता या अधिकारी ठेकेदारांच्या सेटलमेंट कारभाराला चाप बसणार असून मोजमाप न करताच बिले देणाºया अधिकाºयावर कारवाई होणार आहे.
बांधकामाचे फोटो यामध्ये झालेले बांधकाम आणि काय साहित्य आणले त्याचे फोटोही विभागाच्या वेबसाईटवर टाकणे बंधनकारक होणार आहे. यामुळे एकाच कामाचे विविध अँगलमधील फोटो काढून ते वेगवेगळ्या कामाचे भासविणे अशा प्रकारांनाही आळा बसेल.
>खाबुगिरीवर येणार आता अंकुश
या महत्वपूर्ण निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होणार असला तरी या दोघांतील अर्थपूर्ण संबधामुळे या निर्णयाची पारदर्शक अमलबजावणी होईल का? हे पाहणे गरजेचे ठरणारे असून कनिष्ठ अभियंत्याने रेकॉर्ड करायचे त्या आधारे उपाभियंत्याने बीले तयार करायची आणि कार्यकारी अभियंत्यानी ती मंजूर करायची अशी या कामांची बिले काढण्याची पद्धत असते.
यामध्ये अलिखित टक्केवारी ठरलेली असते मात्र प्रत्यक्ष काम कमी आणि बीले मात्र आगाऊ देण्याच्या प्रक्र ीयेत या टक्क्यांची आकडेवारी मोठी असते अशीही चर्चा आहे. यामुळे या खाबुगिरीवर आता चांगलाच अंकुश येणार आहे.