मोखाड्यात ७० हजारांची गावठी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:06 AM2017-07-18T02:06:05+5:302017-07-18T02:06:05+5:30
येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडाळा दूरक्षेत्रामधील सायदे पैकी बोरीचीवाडी येथे मोखाडा पोलिसांनी छापा टाकून ७० हजार ५०० रु पायाची गावठी दारू जप्त
- लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा: येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडाळा दूरक्षेत्रामधील सायदे पैकी बोरीचीवाडी येथे मोखाडा पोलिसांनी छापा टाकून ७० हजार ५०० रु पायाची गावठी दारू जप्त केली आहे आजपर्यतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानली जाते
रविवारी सकाळी सहा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी धाड टाकून २९०० किलो काळा गूळ, नवसागर मिश्रीत रसायन, १४ टाक्या व ३० लीटर दारू जप्त केली आहे . पोलिसांनी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सायदे धरणाचा संपूर्ण परिसर पिंजून काढून गावठी दारूचा हा साठा जप्त केला. पोलिसांचा सुगावा लागताच ही गावठी दारू पाडणारे गंगाराम शिवराम झुगरे बबन जेठू निर्गुडे अनंता जेठू निर्गुडे हे मात्र फरार झाले.
पोलीस अधीक्षक आयपीएस मंजूनाथ शिंगे यांच्या आदेशानुसार डीवायएसपी सुरेश घाडगे यांच्या मार्गर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण पालघर जिल्हा गावठी दारू मुक्त करण्याचा मानस जिल्हा पोलीस प्रशासनाचा असून ही गावठी दारू पाडणाऱ्यावर कठोर करवाई केली जाणार आहे.
-प्रकाश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोखाडा
मुहूर्त साधला गटारीचा
ही कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गटारीच्या आधीच्या आठवड्याचा मुहूर्त साधला याबद्दल तालुक्यातील जनतेत समाधान व्यक्त होते आहे. मात्र ही कारवाई इथे न थांबता पुढेही सुरू रहावी अशी अपेक्षा आहे.