आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

By admin | Published: April 12, 2017 03:55 AM2017-04-12T03:55:19+5:302017-04-12T03:55:19+5:30

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून

Seventh 'eclipse' to construct Agri Bhawan | आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

Next

- सुनिल घरत,  पारोळ

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून १,८०,००० हजार रु पये मूल्यांकन भरले असले तरी अजूनही आगरी समाज उन्नती मंडळाच्या बांधकाम समितीला शासनाकडून सातबारा मिळाला नाही.
या बाबीचा पाठपुरावा उन्नती मंडळाद्वारे सुरूच असून मागील दहा वर्षांच्या शासन दिरंगाईमुळे वाढलेल्या बांधकाम मूल्याची भरपाई देण्याची मागणीही मंडळामार्फत करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात मंडळाद्वारे अनेक सामाजिक हिताच्या कामांची मागणी करण्यात आली असून काही कामे मंजूर झाली आहेत परंतु त्यांचा पुढील प्रवास लालफितीमध्ये आडकला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही मंडळाकडून करण्यात आली आह.
पाठपुराव करुनही शासनाकडून कोणत्याच कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाचे ६० वर्षांवरील सदस्य (यामध्ये नारायण घरत यांचे वय ९५ वर्षे आहे) मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत असून महिन्याभरात शासनाला जाग आली नाही तर येत्या ५ मे रोजी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे उन्नती मंडळाचे सरचिटणीस नरिसंह पाटील यांनी सांगितले आहे.

कामातील भ्रष्टाचार अन वेळकाढूपणा
पारगांव चेकपोस्ट ते दुर्गम आदिवासी बोरीचा पाडा रस्त्याचे काम २०११ या वर्षी तीन भागात करायचे होते. मात्र, ते एकाच भागाचे झाले असून उर्विरत काम न करता ठेकेदाराला सार्वजनिक बांधकामकडून तिन्ही भागांची सर्व रक्कम अदा केल्याची माहिती समोर आली आहे.
पारगाव पुलाचे काम आदिवासी उपयोजनेतून झाले असतानाही यामार्गे केलेली टोल वसुली उपयोजनेत किती जमा झाली आहे. याची माहिती मिळावी. पारगाव, सोनावे, दारशेत ते महामार्गावरील पाचरखे, दारशेत ते उंबरपाडा रस्त्याला निधी मिळावा म्हणून पाठपूरावर सुरु आहे.
दरवर्षी पावसाळ्यात उसगाव ते भाताणे हा रस्ता हमखास पाण्याखाली जातो व पलीकडील ३५ ते ४० गाव पाड्यांचा संपर्क तुटतो. हा रस्ता होत नसल्याने शिवनसई ते नवसई रस्ता व्हावा ही पर्यायी मागणी आहे. त्याचे सर्वेक्षण होऊनही योजना मात्र प्रलंबित आहे.
घाटीम, नवघर, मासवण, बहाडोली या मार्गाची पुलासकट मागणी केली आहे. तसेच खानिवडे टोल नाक्यावरून पालघर व वसई तालुक्यातील हलक्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी आहे.

Web Title: Seventh 'eclipse' to construct Agri Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.