शिट्टीअभावी बविआचा बालेकिल्ला ढासळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:45 PM2019-04-20T23:45:21+5:302019-04-20T23:46:04+5:30

दीड लाखाचा फरक कसा भरून काढणार? यावेळी शिवसेना, भाजपाच्या युतीचे आव्हान

Shalli absence will ruin the cottage? | शिट्टीअभावी बविआचा बालेकिल्ला ढासळणार?

शिट्टीअभावी बविआचा बालेकिल्ला ढासळणार?

Next

पालघर : लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात झालेला उशीर आणि शिट्टी चिन्ह गमावल्याने व नवे निवडणूक चिन्ह रिक्षा ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यास बहुजन विकास आघाडीला अजूनही पूर्णत: यश न मिळाल्याने यश गाठणे तिला अवघड होणार आहे.

बहुजन विकास आघाडी आणि शिट्टी हे दृढ नाते आता संपुष्टात आल्याने बविआ अडचणीत सापडली असून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी स्वत: आ.हितेंद्र ठाकुरांना केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्यायालयात खेटे मारावे लागले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत शिट्टी हे चिन्ह मिळविण्यात त्यांना यश न आल्यास त्यांच्या बालेकिल्ल्यांना भागदाडे पडण्याची विरोधकांची व्यूहरचना यशस्वी होते आहे.

बविआच्या शिट्टी चिन्हा पासून सुरू झालेल्या कोंडीप्रकरण पुढे पुढे गडद होण्याची चिन्हे दिसत असून वसई मधील बविआ पक्षाच्या मोठ्या पॉकेट्सला थेट हात घालण्याची रणनीती विरोधकांकडून खेळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवारानी लोकसभेच्या पोट निवडणुकीत एकत्र गाठलेला ५ लाख १५ हजार ९९२ मतांचा टप्पा आणि आताच्या निवडणुकीत श्रमजीवी सह अन्य पक्षांच्या मदतीने त्यात आता होणारी वाढ आणि बविआच्या उमेदवाराला पडलेली २ लाख २२, ८३८ मते आणि माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी आघाडीच्या कडून मिळालेली १, १९,६०१ अशी मिळून एकूण ३,६२,८११ मतांची बेरीज केल्यावरही उरणारा १, ५३,१८१ मतांचा फरक भरून काढणे बविआला खूपच जड जाणार आहे. त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे ह्यांच्या जाहीर सभांबरोबरच मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांचे आपल्या सहकारी मावळ्यांना घेऊन निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी खेळलेल्या खेळया महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. वसई तालुका आणि बोईसर मतदारसंघातील काही भाग वगळता अजूनही बविआ च्या उमेदवाराला स्वीकारण्यास मतदार उत्सुक नाही.

शिट्टी गेल्याने मते घटणार?
मनोर : महाआघाडी व महायुतीमध्ये काटे की लढत होत असून लोकांच्या डोक्यात बसलेली शिट्टी निशाणी अचानक गेल्याने पालघर तालुक्यत मतदानाच्या दिवशी मतदार राजावर त्याचा परिणाम होईल असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र शिट्टी ऐवजी रिक्षा निशाणीचा प्रचार ही जोमाने सुरू केला आहे. बहुजन विकास आघाडीची शिट्टी हे चिन्ह गेल्या अनेक वर्षा पासून त्यांच्याकडे होता ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद विधानसभा लोकसभा निवडणुकी मध्ये गाव पाड्या मध्ये शिट्टी पोहोचली होती अशिक्षति लोकांच्या ही डोक्यात तिचा होता. ते चित्र आता राहिलेले नाही.

मागील यशाची पुनरावृत्ती घडविणे बविआला अवघड
बोर्डी : सतराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना, बहुजन विकास आघाडी या पक्षाचे शिट्टी हे चिन्ह गोठविण्यात येऊन त्या ऐवजी आॅटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच मतदारांच्या मनावर हे नवे चिन्ह बिंबवून नव्या चिन्हावर मतांचे दान पदरी पाडून घेण्यात बविआला किती यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पालघर (२२) मतदार संघाची पुनर्ररचना झाल्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआचे उमेदवार बळीराम सुकुर जाधव यांना पहिल्या क्र मांकाची २,२३,२३४ मतं मिळाली होती. तर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघातील सहा पैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यातही यश मिळाले होते. त्यावेळी या पक्षाचे चिन्ह शिट्टी होते. ती मिळविण्यात अपयश आल्याने बविआची स्थिती धोकादायक झाली आहे.

Web Title: Shalli absence will ruin the cottage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.