शरद पवार आज डहाणूत, जनतेशी संवाद साधणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:13 AM2018-03-24T03:13:36+5:302018-03-24T03:13:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी डहाणू येथे येत असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ते विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संवाद साधणार आहेत. डहाणू येथील औष्णिक वीज प्रकल्पातील (थर्मल पावर स्टेशन) सभागृहात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

 Sharad Pawar will talk today with trek, public | शरद पवार आज डहाणूत, जनतेशी संवाद साधणार  

शरद पवार आज डहाणूत, जनतेशी संवाद साधणार  

googlenewsNext

डहाणू: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी डहाणू येथे येत असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ते विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संवाद साधणार आहेत. डहाणू येथील औष्णिक वीज प्रकल्पातील (थर्मल पावर स्टेशन) सभागृहात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते जनतेशी संवाद साधणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी गुरूवारी राष्टÑवादी कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तालुक्यातील पदाधिकारी, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास डहाणू येथील थर्मलपावर स्टेशन येथे उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. ते डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसूचना, पालघर लोकसभा पोटनिवडणूक, वाढवण बंदर इत्यादीबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, बागायतदार, बरोबरच काही उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ते काही राजकीय वक्तव्य करतात का याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title:  Sharad Pawar will talk today with trek, public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.