स्थलांतरितांच्या पाल्यांचा ‘आसरा’; डहाणूत अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:51 PM2019-12-31T23:51:45+5:302019-12-31T23:51:54+5:30

विद्यार्थ्यांना घडविण्याचा उपक्रम

The 'shelter' of migrants' sails; Innovative experiments in wisdom | स्थलांतरितांच्या पाल्यांचा ‘आसरा’; डहाणूत अभिनव प्रयोग

स्थलांतरितांच्या पाल्यांचा ‘आसरा’; डहाणूत अभिनव प्रयोग

Next

- अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : तालुक्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने पोटापाण्यासाठी गावोगावी भटकणाऱ्या आदिवासी समाजातील नागरिकांना घरदार सोडून वर्षातील आठ महिने स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट सुटून बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डहाणू तालुक्यात पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे‘आसरा’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.

तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये वर्षभर रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने पावसाळ्यातील चार महिने वगळता ही कुटुंबे वीटभट्टी, बांधकाम व्यवसाय, मासेमारी तसेच शेती बागायतीत मजुरीसाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून जावे लागते. ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी जशा शाळा चालविल्या जातात, तसा प्रकार इथे दिसत नाही. किंवा शासनाने त्यासाठी राबविलेले उपक्रम तितके प्रभावी ठरत नाहीत. एकदा पालकांसोबत रोजगार मिळवण्यासाठी फिरण्याची सवय लागली की, त्या विद्यार्थ्यांचे मत शाळेच्या चार भिंतीत रमत नसल्याने शाळाबाह्य विद्यार्थी, गळती आदी प्रश्न निर्माण होऊन त्यांचे शिक्षण अर्ध्यावर संपते. त्यामुळे बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. तालुक्यातील अशा स्थलांतरित पालकांच्या मुलांनी शाळा सोडून जाऊ नये यासाठी पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे ‘आसरा’ हा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. या कालावधीत अशा विद्यर्थ्यांना त्याच गावात अन्न आणि निवाºयाची सुविधा आसरा केंद्रात उपलब्ध होणार आहे. यासाठी गावातील विधवा तसेच वृद्धांच्या मदतीने हे केंद्र चालविले जाणार असून त्यांना फाउंडेशनतर्फे आर्थिक मोबदला दिला जाणार आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात या तालुक्यातील दाभोण गावच्या पिलेनापाडा, सखदेवपाडा आणि पाटीलपाडा या तीन जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. संस्थेचे स्वयंसेवक आणि शिक्षकांनी सर्व्हे केला असून आतापर्यंत ४५ विद्यार्थ्यांचे अर्ज योजनेसाठी प्राप्त झाले आहेत. तर आसरा सेंटर सुरू करण्यास २० इच्छुकांनी सहमती दर्शविली आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षणाअभावी अंधारमय असते. त्यांना योग्यवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याचा हा उपक्र म आहे.
- योगेश सावे, अध्यक्ष, पेन्स सहयोग फाउंडेशन

Web Title: The 'shelter' of migrants' sails; Innovative experiments in wisdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.